जागतिक युवक कौशल्य दिनानिमित्त 'केटीआय'मध्ये प्रात्यक्षिक कुशल सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:44 PM2019-07-17T12:44:40+5:302019-07-17T12:45:23+5:30

स्किल कार्निव्हल प्रॅक्टिकल वीकचे (प्रात्यक्षिक कुशल सप्ताह) आयोजन कोहिनूरच्या देशभरातील ५० शाखांमध्ये करण्यात आले आहे.

world youth skill day kohinoor technical institute skill carnival | जागतिक युवक कौशल्य दिनानिमित्त 'केटीआय'मध्ये प्रात्यक्षिक कुशल सप्ताह

जागतिक युवक कौशल्य दिनानिमित्त 'केटीआय'मध्ये प्रात्यक्षिक कुशल सप्ताह

Next

मुंबई : गेली ५७ वर्षांपासून तांत्रिक शिक्षणाचा प्रचार व प्रसार करणाऱ्या कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट (केटीआय) मध्ये वर्ल्ड यूथ स्किल डे निमित्त स्किल कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या आठवडाभर चालणाऱ्या उपक्रमामध्ये केटीआयतर्फे जीवनशैलीसाठीच्या कौशल्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. स्किल कार्निव्हल प्रॅक्टिकल वीकचे (प्रात्यक्षिक कुशल सप्ताह) आयोजन कोहिनूरच्या देशभरातील ५० शाखांमध्ये करण्यात आले आहे.

स्पर्धात्मक कार्यसंस्कृतीमध्ये, प्रत्येकाला नोकरी मिळवण्यासाठी तसेच ती मिळाल्यानंतर कंपनी किंवा संस्थेत स्वतःची प्रगती साधण्यासाठी विशेष कौशल्य अंगी असणे आवश्यक झाले आहे. या स्किल कार्निव्हलच्या माध्यमातून,  देशातील प्रत्येक तरुण रोजगारक्षम व्हावा, यासाठी केटीआयतर्फे जागरुकता निर्माण करण्यात येत आहे.  या कार्यक्रमादरम्यान, ‘प्रॅक्टिकल विक’ देखील आयोजित करण्यात आला असून केटीआयच्या ७० टक्क्यांपर्यंत महत्व असलेल्या प्रात्यक्षिक अनुभवाला यातून चालना देण्यात आली. केटीआयच्या प्रोग्राम डिलीव्हरीचे हे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. उद्योगक्षेत्रात काम करण्यासाठी विद्यार्थ्यांना शिकतानाच प्रात्यक्षिकांचा अनुभव दिला जातो.

प्रॅक्टिकल विकद्वारे, केटीआयच्या शाखांतर्फे 13 ट्रेड्सपैकी प्रत्येक आठवड्याला 2 ट्रेड्सची निवड करण्यात येत असून या अंतर्गत विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम दिले जातात. प्रत्येक आठवड्यात सोमवार ते गुरुवार दररोज विद्यार्थ्यांना प्रॅक्टीकल व ट्रेनिंगसाठी विषय दिला जाईल. शुक्रवारी विद्यार्थी मागील दिवसांत जे काही शिकले त्याची उजळणी करण्यासाठी वेळ घेऊ शकतात. त्यानंतर, परिक्षकांच्या एका टीम समोर त्यांना आपल्या आकलनाचे सादरीकरण करायचे असते. शनिवारी, विद्यार्थी ब्रांचमधील परिक्षक व इतर विद्यार्थ्यांसमोर सादरीकरण करतील. विद्यार्थ्यांना मूल्यांकन देण्याची जबाबदारी परिक्षकांची असून अन्य विद्यार्थी प्रकल्पाविषयी प्रश्न विचारू शकतात. यामुळे विद्यार्थ्यांचा त्या त्या विषयाचा पाया मजबूत होण्यास मदत होते. 

या उपक्रमाबद्दल बोलताना केटीआयचे सीओओ मकरंद वागास्कर म्हणाले, "आजच्या नवीन पिढीला त्यांच्या करीयरची सुरूवात करण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये मिळवून देण्यासाठी आपण मदत करणे हे महत्त्वाचे आहे. यामुळे फक्त नवीन पिढीसाठीच नाही तर संपूर्ण देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एक मजबूत पाया रचला जातो. कौशल्य प्रशिक्षणाचे तीन आधार स्तंभ आहेत – सरकारची धोरणे व पायाभूत सुविधा, उद्योगक्षेत्र आणि कौशल्याचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था. एक कौशल्य प्रशिक्षक संस्था या नात्याने आम्ही या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे." 

याचबरोबर, उद्योगक्षेत्रासाठी अत्यंत महत्वाचे असलेल्या मुख्य टेक्निकल स्किल्सची निवड स्किल विक सेशन्ससाठी करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, ऑटोमोबाईल उद्योगात, मशीनचे डिस्मेंटलिंग आणि असेम्बलिंग हे एक महत्वपूर्ण कौशल्य आहे, असेही मकरंद वागास्कर यांनी सांगितले.

Web Title: world youth skill day kohinoor technical institute skill carnival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.