महिला बीट मार्शल जखमी

By admin | Published: August 31, 2014 01:30 AM2014-08-31T01:30:18+5:302014-08-31T01:30:18+5:30

महिलांविरोधी गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या महिला बीट मार्शल पथकाला शुक्रवारी अपघात झाला.

Woman Beat Marshal injured | महिला बीट मार्शल जखमी

महिला बीट मार्शल जखमी

Next
मुंबई : महिलांविरोधी गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या महिला बीट मार्शल पथकाला शुक्रवारी अपघात झाला. महिला बीट मार्शलच्या बाईकला अन्य भरधाव बाईकने धडक दिली. काल संध्याकाळी 5च्या सुमारास हा अपघात पूर्व द्रुतगती मार्गावर रमाबाई आंबेडकर नगरजवळ घडला. यात दोन्ही महिला शिपाई जखमी झाल्या.
मनीषा सदाशिव करडे (वय 25) आणि सोनाली कराड (वय 24) अशी जखमींची नावे आहेत. या दोघी भांडुप पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. त्या बीट मार्शल म्हणून कार्यरत आहेत. काल संध्याकाळी 5च्या सुमारास या दोघी बाईकवरून चेंबूर येथील पूर्व प्रादेशिक विभागाकडे संदेश देण्यासाठी येत होत्या. त्यांची बाईक रमाबाई आंबेडकर नगरजवळ आली, तेव्हा मागून आलेल्या भरधाव बाईकने त्यांना धडक दिली. या अपघातात दोघी जखमी झाल्या. या दोघींवर राजावाडी रुग्णालयात उपचार केले. बाईकचालक संस्कृत ढोकळे (21) हाही जखमी झाला असून, त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी ढोकळेविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Woman Beat Marshal injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.