Will wait for 'best' passengers? | ‘बेस्ट’च्या प्रवाशांची प्रतीक्षा संपणार?

 मुंबई : मुंबईतील सर्व बसमार्ग तोट्यात असल्याने बेस्ट उपक्रमाने बसफे- या कमी केल्या. याचा फटका रिक्षा-टॅक्सीचा प्रवास न परवडणा-या सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी बेस्ट प्रशासनाने खासगीकरणाचा मार्ग अवलंबिला आहे. त्यानुसार भाडेतत्त्वावर घेतलेल्या ४५० बसगाड्या लवकरच मुंबईच्या रस्त्यांवर धावणार आहेत. मात्र, या नवीन बसगाड्यांमुळे
बसथांब्यांवरील प्रवाशांची प्रतीक्षा संपणार का, याविषयी मुंबईकरांमध्ये उत्सुकता आहे.
रेल्वेनंतर मुंबईची दुसरी लाइफलाइन असलेल्या बेस्टच्या बसगाड्यांमधून एकेकाळी रोज ४२ लाख प्रवासी प्रवास करीत होते. मात्र,
आर्थिक संकट वाढत गेल्यानंतर बेस्टच्या बसगाड्यांची स्थिती खराब झाली. एखादे चढण चढताना किंवा उतरताना बसगाड्या बंद पडू लागल्या.
वर्दळीच्या वेळेत भर रस्त्यात बसगाड्या बंद पडल्यावर प्रवाशांचे हाल तसेच वाहतुकीतही अडथळा निर्माण होत होता. यामुळे प्रवासी मेटाकुटीस आले. कालांतराने नादुरुस्त बसगाड्यांची संख्या वाढली. बस आगारांमध्ये बंद बसगाड्यांचा आकडा वाढत गेला, याचा परिणाम बसफेºयांवर होऊन प्रवाशांची बसथांब्यांवरील प्रतीक्षा वाढली.
मुंबईतील एकूण ५०२ मार्गांवर बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्या चालविल्या जातात. मात्र, एकही मार्ग नμयात नसल्याने काटकसरीसाठी
बरेच बसमार्ग बेस्ट प्रशासनाने बंद केले. याचा उलट फायदा शेअर रिक्षा व टॅक्सीला झाला असून त्यांचे धंदे तेजीत आहेत. शेअर रिक्षा-
टॅक्सीबरोबरच मेट्रो व मोनो रेल्वेने बेस्टचा प्रवासीवर्ग पळविला. तरी आजघडीला बेस्टच्या बसगाड्यांमधून २९ लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र, या प्रवाशांना आजही बसथांब्यावर बससाठी तिष्ठत राहावे लागत आहे. उन्हातान्हात मुंबईकरांना दिलासा देणारी वातानुकूलित बसही बंद केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय वाढली आहे. स्वतंत्र बस मार्गिका मुंबईकरांचा प्रवास सुकर करेल, अशी आशा होती.
वाहतुकीच्या मार्गातून स्वतंत्र वाट मिळाली असता बेस्ट बसगाड्या आणि प्रवाशांचा प्रवासही सुसाट झाला असता. मात्र, या प्रस्तावाबाबत
अनास्थाच दिसून येत असल्याने मुंबईकरांना वाहतुकीच्या कोंडीतून आणि धक्के खात प्रवास करावा लागत आहे. त्यात रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या कधी-कधी त्रास वाढवत असते. ‘भाड्याने घेतलेल्या बसगाड्यांची देखभाल संबंधित खासगी कंपनीच करणार आहे. त्यामुळे वाहने ‘फिट’ राहून बसफे-यांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.

दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्था
दिव्यांग प्रवाशांचा प्रवास सुकर होण्यासाठीही या
बसगाड्यांमध्ये विशेष काळजी घेतली जाणार आहे. या
बसगाड्यांमध्ये व्हीलचेअरसाठी विशेष जागा ठेवण्यात
येणार आहे.
ठेकेदारांमार्फत बेस्ट प्रशासन एकूण ४५० बसगाड्या
घेणार आहे. यामध्ये २०० वातानुकूलित मिनी
बसगाड्या, २०० मिनी विनावातानुकूलित व ५० मिडी
विनावातानुकूलित बसगाड्यांचा समावेश आहे. या मिनी
आणि मिडी बसगाड्या वाहतुकीतून सहज मार्ग काढू
शकतील. त्यामुळे बेस्टच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
बेस्ट उपक्रमाच्या
ताμयात सध्या ३
हजार ३३७ बसगाड्या
आहेत. यामध्ये जुलै
२०१८ पर्यंत
बसगाड्यांची संख्या ३
हजार ७८७ वर
पोहोचेल.
पुढच्या टप्प्यात ८००
बसगाड्या भाड्याने घेतल्या
जाणार आहेत.३१ आसनी
असलेल्या मिडी बसमध्ये १२
प्रवासी उभे राहू शकतात. मिनी
बसगाड्यांमध्ये २१ आसनक्षमता
असून नऊ प्रवासी उभे राहू
शकतात.

८.१८ची महिला लोकल पुन्हा सुरू करा
पश्चिम रेल्वेवर सध्या ९.३८ मिनिटांची वसई-चर्चगेट ही महिला विशेष
लोकल धावते. ही लोकल ११ किंवा ११.१५च्या सुमारास चर्चगेट
स्थानकावर पोहोचते. या लोकलमुळे वेळेत कार्यालयात
पोहोचणे शक्य होत नाही. विशेष म्हणजे सकाळी ८ वाजून
१८ मिनिटांनी वसई येथून सुटणारी महिला विशेष लोकल रद्द
करून ही लोकल सुरू करण्यात आली होती. यामुळे ८.१८
मिनिटांची महिला विशेष लोकल पुन्हा सुरू करण्यात यावी.
लोकल फेºया वाढविणे शक्य नसल्यास गर्दीच्या वेळी किमान
महिला राखीव बोगींची संख्या वाढवावी. महिला नोकरदार
वर्गाची संख्या ३० ते ४० टक्के आहे. ‘महिला दिना’चे केवळ
देखावे साजरे न करता प्रत्यक्षात लोकल फेºयांमध्ये वाढ करण्याची गरज आहे.
- श्रद्धा मोरे, महाराष्ट्र रेल्वे महिला प्रवासी संघ, पश्चिम रेल्वे
 


Web Title:  Will wait for 'best' passengers?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.