संशोधन क्षेत्राला देणार प्रोत्साहन - डॉ. अजय चंदनवाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 04:26 AM2018-12-19T04:26:20+5:302018-12-19T04:27:00+5:30

रुग्णसेवेच्या दृष्टिकोनातून कोणते नवे बदल अपेक्षित आहेत?

Will give incentives to research sector - Dr. Ajay Chandanwale | संशोधन क्षेत्राला देणार प्रोत्साहन - डॉ. अजय चंदनवाले

संशोधन क्षेत्राला देणार प्रोत्साहन - डॉ. अजय चंदनवाले

googlenewsNext

केवळ राज्याच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाºया रुग्णांना योग्य सेवा मिळावी म्हणून जे़ जे़ रुग्णालयात काही बदल करण्यात येणार आहेत. त्यात नवीन वैद्यकीय उपकरणे, विभागांचा विस्तार, वैद्यकीय चाचण्यांची अत्याधुनिक सेवा असे सगळे बदल टप्प्याटप्प्याने केले जातील. आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी उत्तम डॉक्टर घडविणे ही मोठी जबाबदारी आहे. त्याकरिता वैद्यकीय शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या माध्यमातून उत्तम डॉक्टर घडविण्यावर अधिक भर देण्यात येणार आहे.

येत्या काळात कोणत्या नव्या सेवा सुरू होतील?
लवकरच जे.जे. रुग्णालयात देणगी समिती खाते सुरू केले जाणार आहे. या माध्यमातून दानशूर व्यक्ती आणि संस्थांना सहायता निधी, वैद्यकीय उपकरणे दान करण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे. जेणेकरून, महत्त्वाच्या शस्त्रक्रिया व प्रत्यारोपण अशा काही मोठ्या वैद्यकीय उपचारांकरिता दुर्बल घटकांतील रुग्णांना मदत करण्यात येईल. राज्यातील वैद्यकीय सेवेत जे.जे. रुग्णालयाची ओळख ‘सामान्य माणसांसाठीचे रुग्णालय’ अशी करण्यावर अधिक भर आहे. याशिवाय, संशोधन क्षेत्रावर अधिक लक्ष देऊन त्या माध्यमातून काम करण्यात येणार आहे. संशोधनाच्या साहाय्याने उपचार पद्धतीही सुधारता येतील, त्यामुळे या दुर्लक्षित क्षेत्राला नवी उभारी देण्यात येईल.
रुग्णालयातील अन्य घटकांच्या समस्यांचे निवारण करण्याविषयी कोणते पाऊल उचलणार आहात?
निवासी डॉक्टरांच्या अनेक प्रलंबित मागण्या आहेत, ज्या संस्थाप्रमुखाने पूर्ण करणे अपेक्षित आहे. मात्र निवासी डॉक्टरांसह, शासकीय कर्मचारी असो वा डॉक्टर्स या सर्व घटकांच्या समस्या आणि प्रश्न जाणून घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यांचे निवारण करण्यात येणार आहे.
(मुलाखत- स्नेहा मोरे)

जे.जे. रुग्णालय समूहाच्या अधिष्ठातापदी डॉ. अजय चंदनवाले यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. याआधी पुण्यातील ससून रुग्णालय व बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठातापद डॉ. चंदनवाले यांनी सांभाळले आहे. गेल्या साडेसात वर्षांत डॉ. चंदनवाले यांनी बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याच्याशी संलग्न ससून रुग्णालयात आमूलाग्र सुधारणा केली आहे. त्याप्रमाणेच, आता जे.जे. रुग्णालयाचा कायापालट करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
 

Web Title: Will give incentives to research sector - Dr. Ajay Chandanwale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई