रेल्वे रुळालगत असणाऱ्या झोपड्यांना कोणाचे अभय? ७ हजार ७३६ बेकायदा झोपड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 05:09 AM2019-02-05T05:09:17+5:302019-02-05T05:09:33+5:30

रेल्वे रुळालगत झोपड्यांचे प्रमाण वाढले असून रेल्वे मार्गालगत एकूण ७ हजार ७३६ झोपड्या बेकायदा आहेत, अशी माहिती अधिकाराखाली माहिती मिळाली आहे.

Who is the abode of the hutments of the railways? 7 thousand 736 illegal slums | रेल्वे रुळालगत असणाऱ्या झोपड्यांना कोणाचे अभय? ७ हजार ७३६ बेकायदा झोपड्या

रेल्वे रुळालगत असणाऱ्या झोपड्यांना कोणाचे अभय? ७ हजार ७३६ बेकायदा झोपड्या

Next

मुंबई : रेल्वे रुळालगत झोपड्यांचे प्रमाण वाढले असून रेल्वे मार्गालगत एकूण ७ हजार ७३६ झोपड्या बेकायदा आहेत, अशी माहिती अधिकाराखाली माहिती मिळाली आहे. रेल्वेलगत आगीच्या घटना, झोपड्यांच्या अतिक्रमणाने रेल्वेचा वेग मंदावणे, विस्तारीकरणाला मर्यादा झोपड्यामुळे आली आहे.

या झोपड्यांवर रेल्वे प्रशासनाची कारवाई कमी पडते की, रेल्वे प्रशासनाच्या कारवाई या झोपड्यापर्यंत पोहोचू दिली जात नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झवेरी यांना माहितीच्या अधिकाराखाली प्राप्त कागदपत्रांनुसार, मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वेच्या हद्दीत ३१ ठिकाणी बेकायदा झोपड्या असून सुमारे ५ हजार ७८४ झोपड्यांची संख्या आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर १७ ठिकाणी बेकायदा झोपड्या असून सुमारे १ हजार ९५२ झोपड्या आहेत. अशा एकूण ७ हजार ७३६ बेकायदा झोपड्या रेल्वे रुळालगत आणि रेल्वे हद्दीत आहेत. सीएसएमटी, वांद्रे, कुर्ला, मालाड, गोरेगाव, माटुंगा, माटुंगा रोड, दादर, मशीद, विक्रोळी या भागात झोपड्यांची संख्या जास्त आहे.
रेल्वेकडून रेल्वे रुळालगतच्या परिसरात संरक्षण भिंती उभारण्यात
येत आहेत. यासह काही ठिकाणी झोपड्यांचा विषय न्यायालयीन प्रविष्ट असल्याने कारवाई करण्यात येत नसल्याचे पश्चिम रेल्वे मार्गाच्या अधिका-यांनी सांगितले.

रेल्वे प्रशासनाकडून कारवाई कारवाई केली जात नाही. झोपड्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रेल्वेच्या अनेक कामांना अडचणी येत आहेत. या बेकायदा झोपडपट्टीवर आळा घालणे आवश्यक आहे. भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
- समीर झवेरी,
माहिती अधिकार कार्यकर्ते

रेल्वे प्रशासनाला
झोपड्या हटविण्यासाठी लोहमार्ग पोलिसांचे कायम सहकार्य असेल. रेल्वे प्रशासनाकडून बेकायदा झोपड्या हटविण्यास सुरुवात केली तर आम्ही त्यांना मदत करण्याचे आश्वासन आधीच दिले आहे.
- निकेत कौशिक,
पोलीस आयुक्त, लोहमार्ग पोलीस

Web Title: Who is the abode of the hutments of the railways? 7 thousand 736 illegal slums

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.