नियमांचे पालन करण्यासाठी काय उपाययोजना केल्या?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 05:54 AM2017-08-19T05:54:42+5:302017-08-19T05:54:44+5:30

सणांच्या काळात ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन केले जावे, यासाठी काय उपाययोजना केल्या

 What are the measures to follow the rules? | नियमांचे पालन करण्यासाठी काय उपाययोजना केल्या?

नियमांचे पालन करण्यासाठी काय उपाययोजना केल्या?

Next

मुंबई : सणांच्या काळात ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन केले जावे, यासाठी काय उपाययोजना केल्या, अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने उल्हासनगर महापालिकेला २२ आॅगस्टपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच गणेशोत्सवासाठी ज्यांनी परवानगी न घेताच रस्त्यावर मंडप बांधले आहेत, ते तातडीने हटविण्याचे निर्देशही न्यायालयाने महापालिकेला दिले.
ध्वनिप्रदूषणासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल हिराली फाउंडेशनने उल्हासनगर महापालिका व पोलिसांविरुद्ध उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे होती. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी उल्हासनगरमध्ये भर रस्त्यावरच महापालिकेची परवानगी न घेता गणेशोत्सवासाठी सात ते आठ मंडप घालण्यात आल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणली. त्यावर न्यायालयाने तातडीने हे मंडप हटविण्याचे निर्देश महापालिकेला देत पुढील सुनावणी २२ अ‍ॅगस्ट रोजी ठेवली.

Web Title:  What are the measures to follow the rules?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.