प्रवाशांच्या गर्दी नियंत्रणासाठी पश्चिम रेल्वेची स्त्री शक्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 04:52 AM2017-12-29T04:52:25+5:302017-12-29T04:52:43+5:30

मुंबई : एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर गर्दी नियंत्रणासाठी विशेष सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे २३२ जवान आणि ९७ महिला सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली.

Western Railway woman power to control crowds! | प्रवाशांच्या गर्दी नियंत्रणासाठी पश्चिम रेल्वेची स्त्री शक्ती!

प्रवाशांच्या गर्दी नियंत्रणासाठी पश्चिम रेल्वेची स्त्री शक्ती!

Next

मुंबई : एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर गर्दी नियंत्रणासाठी विशेष सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे २३२ जवान आणि ९७ महिला सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली. यापैकी ९७ महिला सुरक्षारक्षकांवर महिला प्रवाशांना बोगीत प्रवेश करण्यासाठी रांगेत उभे करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अंधेरी स्थानकापासून या उपक्रमाला सुरुवात करण्यात येणार आहे. रेल्वे सुरक्षा बलासह महामंडळाच्या जवानांवर प्रवासी सुरक्षितता आणि संरक्षणासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे.
अंधेरी स्थानकात महिला बोगीसमोर महिला सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात येईल. अंधेरी स्थानकानंतर बोरीवली, वांद्रे आणि भार्इंदर स्थानकातदेखील महिला सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. याचबरोबर विरार-चर्चगेट आणि भार्इंदर-चर्चगेट लोकलमधील महिला बोगीचे दरवाजे अडवून धरणा-या महिला प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी महिला शीघ्र दलाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पश्चिम रेल्वेच्या विविध स्थानकांवर फलाट, तिकीट आरक्षण केंद्र आणि परिसर आणि गर्दी नियंत्रणासाठी महिला सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे.
महामंडळातील २३२ सुरक्षारक्षकांवर आरपीएफ कर्मचाºयांसह प्रवासी सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे. महामंडळाच्या सुरक्षारक्षकांना उपनगरीय प्रवासी सुरक्षेसाठी दोन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. शिवाय पश्चिम रेल्वेवरील ३४ धोकादायक पादचारी पुलांवरील गर्दी नियंत्रणासह स्थानकातील प्रवेशद्वारांवर, रेल्वे स्थानक परिसर या ठिकाणी महामंडळातील पुरुष सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
>पश्चिम रेल्वेच्या लोकल फे-या - १३५५
प्रवासी संख्या - ३४ लाख
रेल्वे सुरक्षा बल - ९८० जवान
सुरक्षा महामंडळाचे जवान - ३२९ सुरक्षारक्षक
(२३२ पुरुष - ९७ महिला सुरक्षारक्षक)

Web Title: Western Railway woman power to control crowds!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई