पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक, वाहतूक अप धिम्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 02:19 AM2017-11-04T02:19:33+5:302017-11-04T02:19:41+5:30

गोरेगाव ते सांताक्रुझ दरम्यान शनिवारी रात्री ११.३० ते रविवारी पहाटे ३.३० वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेने जम्बोब्लॉक घोषित केला आहे. या कालावधीत पाचव्या रेल्वे मार्गावरील दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.

On the Western Railway today, the night-long block, the traffic-up dhima route | पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक, वाहतूक अप धिम्या मार्गावर

पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक, वाहतूक अप धिम्या मार्गावर

Next

मुंबई : गोरेगाव ते सांताक्रुझ दरम्यान शनिवारी रात्री ११.३० ते रविवारी पहाटे ३.३० वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेने जम्बोब्लॉक घोषित केला आहे. या कालावधीत पाचव्या रेल्वे मार्गावरील दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. अप जलद मार्गावर हा ब्लॉक आहे. परिणामी ब्लॉक काळात वाहतूक अप धिम्या मार्गावर वळविण्यात येईल. ब्लॉक कालावधीत डाऊन मार्गावरील मेल-एक्स्प्रेस ट्रेन डाऊन जलद मार्गावरून चालविण्यात येतील. यामुळे या ट्रेन काहीशा विलंबाने धावतील. ब्लॉकबाबत विस्तृत माहिती पश्चिम रेल्वेच्या सर्व स्थानकांना देण्यात आली आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेतर्फे देण्यात आली.

Web Title: On the Western Railway today, the night-long block, the traffic-up dhima route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.