अखेर मुंबईतील ‘वेस्ट’ही ठरणार ‘बेस्ट’!, रखडलेल्या प्रकल्पांचा मार्ग होणार मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 06:38 AM2019-02-07T06:38:31+5:302019-02-07T06:38:45+5:30

आरोग्याला धोकादायक आणि प्रदूषणाला आमंत्रण देणाऱ्या कचºयाचा भार मुंबईवरून कमी करण्याच्या महापालिकेच्या प्रयत्नाला अखेर यश मिळणार आहे.

'West' will be the best 'Mumbai' | अखेर मुंबईतील ‘वेस्ट’ही ठरणार ‘बेस्ट’!, रखडलेल्या प्रकल्पांचा मार्ग होणार मोकळा

अखेर मुंबईतील ‘वेस्ट’ही ठरणार ‘बेस्ट’!, रखडलेल्या प्रकल्पांचा मार्ग होणार मोकळा

Next

- शेफाली परब-पंडित
मुंबई -आरोग्याला धोकादायक आणि प्रदूषणाला आमंत्रण देणाऱ्या कचºयाचा भार मुंबईवरून कमी करण्याच्या महापालिकेच्या प्रयत्नाला अखेर यश मिळणार आहे. कच-यावर प्रक्रियेच्या बराच काळ रखडलेल्या प्रकल्पांना एकाच वेळी गती मिळेल. कचºयापासून वीजनिर्मिती, मुलुंड क्षेपणभूमी बंद करणे आणि बांधकामाच्या कचºयावर प्रक्रिया या प्रकल्पांचा मार्ग मोकळा झाला आहे. बांधकामांच्या कचºयावर प्रक्रिया करणारी मुंबई महापालिका पहिली महापालिका म्हणून ओळखली जाणार आहे. त्यामुळे मुंबईतील ‘वेस्ट खºया अर्थाने बेस्ट’ ठरणार आहे.

मुंबईतील क्षेपणभूमींची क्षमता संपल्यामुळे कचºयाचे प्रमाण कमी करणे, हा शेवटचा पर्याय महापालिकेकडे उरला आहे. गेल्या वर्षभरात ७,९०० मेट्रिक टन कचरा ७,२०० मेट्रिक टनवर आणल्याचा दावा पालिका प्रशासन करीत आहे. मात्र, हे प्रमाण सहा ते पाच हजार मेट्रिक टनपर्यंत कमी आणण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे. त्यानुसार, कचºयावर प्रक्रियेचे काही प्रकल्प महापालिकेने हाती घेतले होते. कचºयाचे वर्गीकरण, गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारातच प्रक्रिया या प्रकल्पांना हळूहळू यश मिळत आहे. मात्र, कचºयांपासून वीजनिर्मिती, बांधकाममधील टाकाऊ कचºयांवर प्रक्रिया या प्रकल्पांसाठी दोन-तीन वेळा निविदा मागविल्यानंतरही कोणतीच कंपनी पुढे आली नाही.
अखेर हे प्रकल्प गुंडाळण्याची वेळ आली होती. त्यामुळे पालिकेने अखेर यात बदल करीत, देवनार येथील क्षेपणभूमीवर दररोज तीन हजार मेट्रिक टनऐवजी ६०० मेट्रिक टन कचºयांवर प्रक्रिया करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू असून, १ मे, २०१९ पर्यंत कार्यादेश देण्यात येणार आहे, तर मुंबईत मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बांधकामांचा कचराही डोकेदुखीचे कारण ठरत आहे. या कचºयांवर प्रक्रिया करण्याच्या प्रयोगाला मात्र प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, हा प्रकल्प शहरासाठी महत्त्वाचा असल्याने महापालिका पुन्हा निविदा मागविणार आहे. या प्रकल्पवरही १ जून, २०१९ पर्यंत सुरू करण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे.

छोटा प्रकल्प उभारण्याची तयारी

बांधकामाच्या कचºयांपासून प्रक्रिया करणारे अनेक छोटे प्रकल्प देशात आहेत. मात्र, मुंबईत दररोज १,२०० टन डेब्रिज तयार होत असते. एवढ्या मोठ्या प्रमाणात डेब्रिजवर प्रक्रिया करण्यासाठी कोणी तयार नाही. त्यामुळे छोटे-छोटे प्रकल्प उभे करून थोड्या प्रमाणात डेब्रिजवर पुनर्प्रक्रिया करणाचा विचार सुरू असल्याचे एका अधिकाºयाने सांगितले. गेल्या दहा वर्षांपासून दिल्लीमध्ये डेब्रिजवर पुनर्प्रक्रिया केली जात आहे. मात्र, तीन छोट्या प्रकल्पांच्या माध्यमातून दररोज सुमारे अडीच हजार मेट्रिक टन डेब्रिजवर प्रक्रिया केली जात आहे.

मुंबईतील साडेतीन हजार गृहनिर्माण सोसायट्यांमधून १,४१६ सोसायट्यांनी कचºयांवर प्रक्रिया सुरू केली आहे.
नियमांचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात कचरानिर्मिती करणाºया सोसायट्यांकडून ३२ लाख रुपये दंड वसूल.
 

Web Title: 'West' will be the best 'Mumbai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई