मुंबईत गुरुवारी पाणीकपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 01:16 AM2018-01-15T01:16:38+5:302018-01-15T01:16:49+5:30

महापालिकेतर्फे माहिम भूमिगत बोगद्याजवळ १,२०० मिमी. व्यासाच्या झडपेच्या दुरुस्तीचे काम, १८ जानेवारी रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत हाती घेतले जाणार आहे

 Waterquake in Mumbai on Thursday | मुंबईत गुरुवारी पाणीकपात

मुंबईत गुरुवारी पाणीकपात

Next

मुंबई : महापालिकेतर्फे माहिम भूमिगत बोगद्याजवळ १,२०० मिमी. व्यासाच्या झडपेच्या दुरुस्तीचे काम, १८ जानेवारी रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे मरोळ-मरोशीपासून माहिम-रूपारेल ते रेसकोर्सपर्यंतचा जलबोगदा १२ तासांकरिता बंद करावा लागणार आहे.
या कामामुळे १८ जानेवारी रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत व मुंबईत ठिकठिकाणी पाणीपुरवठा होणार नाही, तसेच काही ठिकाणी पाण्याचा दाब कमी राहील, अशी माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली.
नरिमन पॉइंट, बॅकबे, कफ परेड, कुलाबा, नेव्हीनगर, नेवी, बोरीबंदर/ साबुसिद्दीक क्षेत्र, रेल्वे झोन, बॅकबे क्षेत्र (नेताजी सुभाषचंद्र बोस रोड, ई आणि एस रोड), लिटिल गिब्ज रोड, रिज रोड, पेडर रोड, भुलाभाई देसाई रोड, वाळकेश्वर रोड, नेपियन्सी रोड, कारमेकल/ अल्टामाउंट रोड, ताडदेव रोड व एमपी मिल क्षेत्र, बाई य. ल. नायर आणि कस्तुरबा रुग्णालय, सिटी सप्लाय क्षेत्र (एस.एल. रहेजा रोड, मोदी रोड, एल. जे. रोड, एस. व्ही. एस. रोड, टी. एच. कटारीया रोड, बाळ गोविंददास रोड, रानडे रोड, सेनापती बापट मार्ग, गोखले रोड, एन. सी. केळकर रोड, एस. के. बोले रोड, भवानी शंकर रोड, काकासाहेब गाडगीळ मार्ग), सिटी सप्लाय क्षेत्र (बी. डी. डी. चाळ एन. एम. जोशी मार्ग येथे, ए. बी. रोड, सेनापती बापट रोड, एस. व्ही. एस. रोड, गणपतराव कदम मार्ग, पांडुरंग बुधकर रोड, वरळी कोळीवाडा), सखुबाई मोहिते मार्ग, अहुजा सप्लाय आणि ९०० मिमी. व्यासाचा वरळी टेकडी जलाशय आउटलेट क्षेत्र (वरळी बी.डी.डी. चाळ), जनरल क्षेत्र, वांद्रे रिक्लमेशन, पेरी रोड, चॅपल रोड, बी. जे. रोड, खारदांडा, दिलीपकुमार क्षेत्र, कोलडोंगरी, झिकझॅक रोड, पाली माला रोड, बाजार रोड आणि युनियन पार्क क्षेत्र या भागांत पाणीपुरवठा होणार नाही.

Web Title:  Waterquake in Mumbai on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी