गोराईच्या आदिवासी बांधवांच्या घरांच्या भिंती वारली चित्रकलेने साकारल्या

By मनोहर कुंभेजकर | Published: January 30, 2023 05:16 PM2023-01-30T17:16:29+5:302023-01-30T17:17:13+5:30

यावेळी आदिवासी बांधवांनी पारंपारिक तारपा नृत्य सादर केले अशी माहिती सुप्रिया चव्हाण यांनी दिली.

walls of the houses of tribal brothers of gorai were painted with Warli painting | गोराईच्या आदिवासी बांधवांच्या घरांच्या भिंती वारली चित्रकलेने साकारल्या

गोराईच्या आदिवासी बांधवांच्या घरांच्या भिंती वारली चित्रकलेने साकारल्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई  विभागामार्फत सन २०२१-२२ जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेच्या निधीतून नाविन्यपूर्ण योजनेतून  बोरिवली पश्चिम,बाबर पाडा गावठाण, गोराई गाव येथील घरांच्या भिंतीवर वारली चित्रकलेने सुशोभिकरण योजनेचा उदघाटन संभारंभ बोरिवली विधानसभा क्षेत्राचे स्थानिक आमदार सुनिल राणे,उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी एकात्मिक आदिवासी विकास  प्रकल्प अधिकारी मुंबईच्या सुप्रिया चव्हाण, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम,आरे विभाग विशेष प्रकल्प गुंजन दिघावकर,कष्टकरी शेतकरी संघटना अध्यक्ष विठ्ठल लाड व कुणाल बाबर तसेच आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या योजनेचा हेतू आदिवासी घरे एकसारखे दिसावीत तसेच आदिवासी भागांमध्ये पर्यटनाला चालना देणे हा आहे.या नाविन्यपूर्ण योजनेतून  २८ आदिवासी घरे   १ समाजमंदिर ,२ शौचालय ,६० झाडे, आणि १७ झाडाचे कट्टे वारली चित्रकलेने सुशोभित करण्यात आले आहे. यावेळी आदिवासी बांधवांनी पारंपारिक तारपा नृत्य सादर केले अशी माहिती सुप्रिया चव्हाण यांनी दिली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: walls of the houses of tribal brothers of gorai were painted with Warli painting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.