वाकोल्यात भिंत कोसळून ४ ठार

By admin | Published: July 28, 2015 02:57 AM2015-07-28T02:57:46+5:302015-07-28T02:57:46+5:30

वाकोला पाइपलाइन रोडवरील द आर्क सोसायटीमधील झाड भिंतीवर कोसळून आणि भिंत लगतच्या कच्च्या झोपड्यांवर पडून रविवारी मध्यरात्री झालेल्या दुर्घटनेत ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Wakolate wall collapses 4 killed | वाकोल्यात भिंत कोसळून ४ ठार

वाकोल्यात भिंत कोसळून ४ ठार

Next

मुंबई : वाकोला पाइपलाइन रोडवरील द आर्क सोसायटीमधील झाड भिंतीवर कोसळून आणि भिंत लगतच्या कच्च्या झोपड्यांवर पडून रविवारी मध्यरात्री झालेल्या दुर्घटनेत ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर याच दुर्घटनेत ५ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारार्थ व्ही.एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. मृतांमध्ये ६वर्षीय मुलाचा समावेश आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या सरी अधूनमधून कोसळत असून, त्यामुळे सातत्याने पडझडीच्या घटना घडत आहेत. पश्चिम उपनगरात रविवारी मध्यरात्री २ वाजून ५७ मिनिटांनी सांताक्रुझ पश्चिमेकडील वाकोला पाइपलाइन रोडवरील द आर्क सोसायटीमधील झाड भिंतीवर पडल्याची घटना घडली; आणि हीच भिंत रस्त्यालगतच्या कच्च्या झोपड्यांवर पडली. दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि तत्काळ मदतकार्याला सुरुवात केली. झोपड्यांवर पडलेल्या भिंतीचे डेब्रिज हटविताना अधूनमधून पडणाऱ्या सरींचा मदतकार्यात अडथळा येत होता. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, याबाबत अधिक तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)

मृतांची नावे : संतोष नत्तमा अर्जुन (६), सरोज कडवेल अर्जुन (४८), कडवेल अबिधा अर्जुन (४२),प्रमिला अभिमन्यु (२८)
जखमींचे नावे : परमेश्वरी (३), धनलक्ष्मी (१९), मरे चिन्नपय्यन (१५), मंगेशा वेलय्या (३५), जयश्री राजू (दीड वर्ष)

Web Title: Wakolate wall collapses 4 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.