मुंबईकरांची तहान भागण्यासाठी २०५१ पर्यंतची प्रतीक्षा, महापौरांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 03:30 AM2018-08-12T03:30:49+5:302018-08-12T03:31:04+5:30

शहर-उपनगरात वाढणाऱ्या लोकसंख्येच्या तुलनेत मूलभूत सुविधा तोकड्या पडत आहेत. त्यामुळे पाण्याची मागणी आणि पुरवठ्यात मोठी दरी निर्माण झाली आहे, असा पुनरुच्चार महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे.

Waiting till 2051 to wait for the thirst of Mumbaiites, Mayor's information | मुंबईकरांची तहान भागण्यासाठी २०५१ पर्यंतची प्रतीक्षा, महापौरांची माहिती

मुंबईकरांची तहान भागण्यासाठी २०५१ पर्यंतची प्रतीक्षा, महापौरांची माहिती

Next

मुंबई : शहर-उपनगरात वाढणाऱ्या लोकसंख्येच्या तुलनेत मूलभूत सुविधा तोकड्या पडत आहेत. त्यामुळे पाण्याची मागणी आणि पुरवठ्यात मोठी दरी निर्माण झाली आहे, असा पुनरुच्चार महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे. मुंबईची वाढती लोकसंख्या आणि वाढते शहरीकरण पाहून दमणगंगा, गारगाई व पिंजाळ हे तीन धरण प्रकल्प तयार केले जाणार आहेत. हे काम पूर्ण झाल्यास २०५१ पर्यंत मुंबईकरांची तहान भागेल, अशी माहिती महापौरांनी धरणांच्या पाहणी दौºयातून दिली.
मुंबईला पाणीपुरवठा करणाºया मोडक सागर, तानसा धरण, पिसे बंधारा, पांजरापूर जलशुद्धीकरण प्रकल्प आदी ठिकाणांची पाहणी महापौरांनी केली. मुंबईला पाणीपुरवठा करणाºया तलाव परिसरात समाधानकारक पाऊस पडल्याने सर्व धरणे भरलेली आहेत. त्यामुळे मुंबईकरांना यंदा पाण्याची कमतरता भासणार नाही. मात्र, नागरिकांनीही पाणी वापराबाबत आवश्यक खबरदारी घेणे अपेक्षित असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच पाण्याची मागणी सतत वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रकल्प वेळेत पूर्ण होणे गरजेचे

मुंबईला पाणीपुरवठा करणाºया तलावांत सध्या
१२ लाख ४१ हजार दशलक्ष लीटर म्हणजे एकूण आवश्यक पाणीसाठ्याच्या ८५ टक्के पाणीसाठा आहे.
मुंबईला वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने अधिक पाणी हवे असून, त्यासाठी पालिका प्रशासनाने दमणगंगा (दररोज १५८६ दशलक्ष लीटर) पिंजाळ (दररोज ८६५ दशलक्ष लीटर) व गारगाई (४४० दशलक्ष लीटर) हे तीन प्रकल्प प्रस्तावित केले आहेत.
हे प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्यास मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती मुख्य जल अभियंता अशोक तवाडिया यांनी दिली.
मुंबईला दररोज सुमारे तीन हजार आठशे दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. मात्र पाण्याची मागणी सुमारे साडेचार हजार दशलक्ष लीटर आहे.
पाणी चोरी व गळतीमध्ये दररोज सुमारे नऊशे दशलक्ष लीटर पाणी वाया जात आहे.

मुंबईतील वाढती लोकसंख्या, इमारतींची बांधकामे पाहता मुंबईकरांची वाढती तहान भागविण्यासाठी महापालिकेने दमणगंगा, पिंजाळ व गारगाई हे तीन पाणीप्रकल्प हाती घेतले आहेत. हे पाणी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सन २०५१ पर्यंत मुंबईकरांची तहान भागणार आहे, असे त्यांनी सांगितले. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, मुंबईकरांना भविष्यात पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी पालिका पाण्याचे नवीन प्रकल्प हाती घेत असून, ते प्रकल्प लवकरच मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन दिले.

Web Title: Waiting till 2051 to wait for the thirst of Mumbaiites, Mayor's information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.