पालघरात भरघोस मतदान

By Admin | Published: February 14, 2016 03:03 AM2016-02-14T03:03:32+5:302016-02-14T03:03:32+5:30

या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शनिवार सकाळपासून मतदानाला असलेला थंड प्रतिसादात वाढ होऊन दुपार ३ वाजेपर्यंत एकूण ४२.५९ टक्के मतदान झाले होते. मात्र मतदानाची

Voting in the Palghar | पालघरात भरघोस मतदान

पालघरात भरघोस मतदान

googlenewsNext

पालघर : या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शनिवार सकाळपासून मतदानाला असलेला थंड प्रतिसादात वाढ होऊन दुपार ३ वाजेपर्यंत एकूण ४२.५९ टक्के मतदान झाले होते. मात्र मतदानाची वेळ संपली तेव्हा अंतिम टक्केवारी ६२ टक्के असल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी दिली आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आजच्या मेक इन इंडियाच्या उद्घाटन सोहळ्यात वाढवण बंदराबाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, अशी भूमिका माध्यमातून जाहीर केली होती. परंतु, या बंदरासाठी तरतूद करण्याची घोषणा करून देसाई यांना भाजपने आज अक्षरश: तोंडघशी पाडले. त्यामुळे सेनेचा उमेदवार पाडण्यासाठी हे मुद्दाम केल्याची चर्चा होती.

आधार नाकारले,मतदार मतदानापासून वंचित
१पालघर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आॅब्झर्व्हर राजीव शंकर व रविराज इलवे यांनी पालघर मधील आर्यन शाळेतील मतदान बूथची पाहणी केली. यावेळी मतदानासाठी आधारकार्डची कॉपी घेऊन आलेल्या मतदारांना मतदानापासून रोखण्यात आल्याने नाराज मतदारांनी त्यांना विचारणा केली. यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आम्ही याबाबत विचारणा केल्याचे सांगितले. मात्र पासपोर्ट, ड्रायव्हींगलायसन्स, पॅनकार्ड, पेन्शन कागदपत्रे इ. च्या कागदपत्रासह आलेल्या मतदारालाच मतदान करता येईल असे सांगितल्याने अनेक मतदारांनी घरी जाणे पसंत केले.
२ मुंबईच्या मेक इन इंडिया कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी अपेक्षाप्रमाणे वाढवण बंदरासह इतर दोन बंदरांना १६ हजार कोटीचा प्रस्तावाची घोषणा केल्याची माहिती कळल्यानंतर संतप्त झालेल्या वाढवणच्या टिघरेपाडा येथे मतदानासाठी उभारलेल्या सेनेच्या बूथवर गावाबाहेरून आलेल्या सेना पदाधिकारी कार्यकर्त्यांना ग्रामस्थांनी पिटाळून लावले. यात महिलांचा मोठा सहभााग होता.
३ पंतप्रधान मोदींच्या वाढवण बंदराच्या उभारणीसाठी १६ हजार कोटी रू. च्या गुंतवणूकी संदर्भातील बातम्यांचे फ्लेक्स किनारपट्टीवरील गावागावामध्ये लावले जात असल्याने सेनेच्या उमेदवारांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
४काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र गावित, त्यांची पत्नी व दोन मुलांनी आज पालघर मराठी शाळा व आर्यन शाळेमधील मतदान केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला तर सेनेचे उमेदवार अमीत घोडा याने आपल्या पत्नीसह रानशेत आश्रमशाळेमध्ये जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. तर बविआच्या उमेदवार मनीषा निमकर या पालघर विधानसभा क्षेत्राबाहेरील कर्दळ (सफाळा) गावात राहत असल्याने त्यांना स्वत: मतदान करता आले नाही.
५ उमरोळी येथील रुपेश घरत यांचे लग्न
असल्याने लग्न लागण्यापुर्वी प्रथम त्याने मतदानाचा हक्क बजावला.

Web Title: Voting in the Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.