पाणी तक्रारींसंदर्भात प्रत्यक्ष भेटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 02:34 AM2018-02-24T02:34:40+5:302018-02-24T02:34:40+5:30

पालिकेच्या ‘पी’ दक्षिण विभागातील जलअधिकारी व प्लंबरचे साटेलोटे एका व्हिडीओ क्लिपमार्फत ‘लोकमत’ने उघड केले होते.

Visit directly with the water complaints | पाणी तक्रारींसंदर्भात प्रत्यक्ष भेटा

पाणी तक्रारींसंदर्भात प्रत्यक्ष भेटा

Next

गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई : पालिकेच्या ‘पी’ दक्षिण विभागातील जलअधिकारी व प्लंबरचे साटेलोटे एका व्हिडीओ क्लिपमार्फत ‘लोकमत’ने उघड केले होते. या सगळ्यामुळे गोरेगावकरांना पाण्यासाठी कशी वणवण करावी लागतेय याच्यावरही ‘लोकमत’ने प्रकाश टाकला होता.
अत्यंत गंभीर होत चाललेल्या या पाणीप्रश्नाच्या बातमीची दखल आमदार आणि राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी घेतली असून नागरिकांनी पाणी समस्येबाबत मला प्रत्यक्ष येऊन भेटावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यामुळे गोरेगावकरांची पाण्याची समस्या आता तरी सुटेल का, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

१५ दिवसांत नळजोडणी देणे बंधनकारक
नळजोडणीची प्रक्रिया आॅनलाइन करण्यामागचा उद्देश लोकांना फॉर्म भरणे सोपे व्हावे आणि ती प्रक्रिया सुरळीत व्हावी असाच आहे.
१५ दिवसांत नळजोडणी करून देणे, हे पालिकेला बंधनकारक आहे.
एखाद्या कारणामुळे (कागदपत्र अथवा काही चार्जेस न भरल्यामुळे) त्या कामात अडथळा येणार असेल, तर त्यासाठी ‘धक्का लेटर’ अथवा ‘रिफ्युजल लेटर’ संबंधित अर्जदाराला तातडीने पाठविणेदेखील पालिकेची जबाबदारी आहे.

जल विभागात प्रवेश निषिद्ध
‘लोकमत’ने पी-दक्षिणच्या जल विभागातील परिस्थिती उघड केल्यानंतर कोणत्याही अनोळखी व्यक्तीला या विभागात प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे. तसेच प्लंबर आणि सामान्य नागरिकांना भेटण्यासाठी दुपारी ३ ते ५ या वेळेचा फलक बाहेर लावण्यात आला आहे.
मात्र, या वेळेत अधिकारी कार्यालयात उपस्थितच
नसतात, अशी नागरिकांची तक्रार आहे.

येथील पाण्याची समस्या फारच गंभीर असून ‘लोकमत’मुळे ही बाब उघडकीस येण्यास मदत झाली आहे. गोरेगाव परिसरात पालिका अधिकाºयांमुळे ज्या नागरिकांचे पाण्याचे काम अद्याप अडले आहे, त्यांनी याबाबत आमच्याकडे तक्रार करावी. जेणेकरून ती सोडविण्याच्या उद्देशाने आम्हाला योग्य ती पावले उचलता येतील.
- विद्या ठाकूर, स्थानिक आमदार

Web Title: Visit directly with the water complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.