Viral : मनसैनिकाने फोन केला अन् राम कदमांना राग आला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 11:20 IST2018-09-06T09:50:31+5:302018-09-06T11:20:32+5:30
राज्यभरातून त्यांच्यावर टीका करण्यात आहे. तसेच विरोधकांनी आणि महिला संघटनांनीही कदम यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. तर, एका मनसैनिकाने राम कदम यांना फोन करुन चांगलेच सुनावले.

Viral : मनसैनिकाने फोन केला अन् राम कदमांना राग आला!
मुंबई - भाजपा आमदार राम कदम गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. घाटकोपर येथील दहीहंडी कार्यक्रमात कदम यांनी तुमच्यासाठी मुली पळवून आणू, असे बेताल वक्तव्य केले होते. त्यानंतर, राज्यभरातून त्यांच्यावर टीका करण्यात आहे. तसेच विरोधकांनी आणि महिला संघटनांनीही कदम यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. तर, एका मनसैनिकाने राम कदम यांना फोन करुन चांगलेच सुनावले.
राम कदम यांच्या बेताल वक्तव्यामुळे राज्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मनसेचा कार्यकर्ता असलेल्या एका मनसैनिकाने राम कदम यांना फोन करुन बेताल वक्तव्याचा जाब विचारला. यावेळी जर तुमच्या घरातील मुलगी आवडली तर, तुम्ही असचं करणार का? असा सवालही मनसैनिक सुधीर कोलापटे याने विचारला आहे. या प्रश्नावर तू कुठून बोलतोस, आणि कुठे राहतोस असा प्रतिप्रश्न राम कदम यांनी विचारला आहे. तसेच थांब तुझ्याघरी पोलीस पाठवतो, असा दमही राम कदम यांनी फोनवरुन बोलणाऱ्या सुधीर कोपलटे यांना दिला. सध्या सोशल मीडियावरुन हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तसेच सुधीर कोलापटे यांना नेटीझन्सकडून समर्थनही मिळत आहे.
पाहा व्हिडिओ -