...हे तर जनतेच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 05:02 AM2018-07-19T05:02:04+5:302018-07-19T05:02:14+5:30

मेट्रो-३चे काम रात्रभर सुरू ठेवून नागरिकांना घटनेच्या अनुच्छेद २१ अंतर्गत बहाल केलेल्या मूलभूत अधिकारांचे सकृतदर्शनी उल्लंघन करण्यात येत आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने बुधवारी नोंदविले.

... this is a violation of the fundamental rights of the people | ...हे तर जनतेच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन

...हे तर जनतेच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन

Next

मुंबई : मेट्रो-३चे काम रात्रभर सुरू ठेवून नागरिकांना घटनेच्या अनुच्छेद २१ अंतर्गत बहाल केलेल्या मूलभूत अधिकारांचे सकृतदर्शनी उल्लंघन करण्यात येत आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने बुधवारी नोंदविले.
मेट्रो-३च्या कामादरम्यान ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. कफ परेड येथे मेट्रोचे काम रात्रभर सुरू असल्याने नागरिकांना शांत झोप मिळत नाही. त्यामुळे रात्री काम बंद करावे किंवा आवाजाची मर्यादा पाळावी, अशी याचिका कफ परेड येथील रहिवासी रॉबिन जयसिंगानी यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. त्यावरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे होती. कफ परेड येथील आवाजाच्या पातळीची नोंद करून एमपीसीबी अहवाल सादर करत नाही, तोपर्यंत येथे रात्री १० नंतर काम करण्यास परवानगी देणार नाही, असे उच्च न्यायालयाने बुधवारच्या सुनावणीत स्पष्ट केले. गेल्या वर्षी न्यायालयाने मेट्रोचे काम रात्री दहानंतर करण्यास स्थगिती दिली. ती हटविण्यासाठी एमएमआरसीएला न्यायालयात अर्ज केला आहे. न्यायालयाने गुरुवारी याबाबत आदेश देऊ, असे स्पष्ट केले.

Web Title: ... this is a violation of the fundamental rights of the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो