विक्रोळीतील कॉलेजच्या गर्ल्स वॉशरूममध्ये कॅमेरा; शिपायाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:25 PM2017-07-21T12:25:03+5:302017-07-21T12:25:59+5:30

विक्रोळीतील नामांकित कॉलेजमध्ये विद्यार्थीनींची अश्लिल व्हिडीओ क्लिप काढण्यासाठी बाथरूममध्ये कॅमेरा बसविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

Vermilion College Girl Washroom Camera; The arrest of the soldier | विक्रोळीतील कॉलेजच्या गर्ल्स वॉशरूममध्ये कॅमेरा; शिपायाला अटक

विक्रोळीतील कॉलेजच्या गर्ल्स वॉशरूममध्ये कॅमेरा; शिपायाला अटक

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 21- विक्रोळीतील एका कॉलेजमध्ये विद्यार्थीनींची अश्लिल व्हिडीओ क्लिप काढण्यासाठी बाथरूममध्ये कॅमेरा बसविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कॉलेजचा शिपाई विजय शिवथरेला अटक करण्यात आली आहे. कॉलेजमधील एका विद्यार्थीनीला वॉशरूममध्ये कॅमेरा सुरू असलेला मोबाइल आढळून आल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. 
 
29 वर्षीय आरोपी विजय शिवथरेला बुधवारी रात्री त्याच्या घरातून अटक करण्यात आली आहे. गेल्या एक वर्षापासून विजय त्या कॉलेजमध्ये शिपाई म्हणून कार्यरत आहे. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता कॉलेजमधील एक विद्यार्थीनी वॉशरूममध्ये गेली होती. तेव्हा तिथे तिला कार्डबोर्डचे तुकडे आणि विटांच्या मागे काळ्या रंगाची काच दिसली. ते कार्डबोर्डचे तुकडे बाजूला केल्यावर त्या मुलीला तिथे फोन सापडला. त्या फोनमधील कॅमेरा सुरू असल्याचं त्या मुलीच्या लक्षात आलं. 
आणखी वाचा
 

मुंबईतील आरे परिसरात दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार?

ठाण्यात तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण; दोन तरुणांना अटक

तो मोबाइल फोन घेऊन ती विद्यार्थीनी कॉलेजच्या शिक्षकाकडे गेली. त्यानंतर हा सगळा कॉलेजच्या शिक्षकाने वरिष्ठांपर्यंत पोहचविला, अशी माहिती एका तपास अधिकाऱ्याने दिली आहे. ही घटना उजेडात आल्यानंतर पहिला संशय हा शिपायावरच गेला. कारण आरोपी शिपाई विजय हा कॉलेजच्या वेळेच्या आधी आणि कॉलेजची वेळ संपल्यानंतर सगळ्या वॉशरूमची तपासणी करायचा. विक्रोळी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी श्रीधर यांनी ही माहिती दिली आहे. वॉशरूममध्ये सापडलेला तो फोन तपासल्यावर त्या फोनमध्ये विजयच्या मित्रांचे आणि कुटुंबियांचे फोन नंबर सापडले. त्यामुळे हा सर्व प्रकार विजय शिवथरेने केल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. 

 
दरम्यान, या प्रकरणाचा पुढचा तपास पोलीस करत असून याआधीही असा प्रकार आरोपी विजय शिवथऱेने केला आहे का? याची तपासणी पोलिसांकडून केली जाते आहे. 

Web Title: Vermilion College Girl Washroom Camera; The arrest of the soldier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.