विमा सल्लागार असल्याची बतावणी करुन वृद्धाला घातला 52 लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 08:49 PM2019-02-17T20:49:19+5:302019-02-17T20:52:34+5:30

दोन भामट्यांकडून वृद्धाची फसवणूक 

two persons makes fraud of 52 lakhs pretending themselves as an insurance advisor | विमा सल्लागार असल्याची बतावणी करुन वृद्धाला घातला 52 लाखांचा गंडा

विमा सल्लागार असल्याची बतावणी करुन वृद्धाला घातला 52 लाखांचा गंडा

Next

मुंबई : विमा कंपनीचे सल्लागार असल्याचे भासवित दोन दिवसामध्ये दीड लाख रुपये मिळवून देण्याच्या बहाण्याने दोघा भामट्यांनी एका ७६ वर्षाच्या वृद्धाला तब्बल ५२ लाखाला गंडा घातल्याचा प्रकार भांडूप येथे घडला. याप्रकरणी कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाहूर रेल्वे स्थानकाजवळील (पू) स्वस्तिक हाऊसिंग सोसायटीत रहात असलेले रामचंद्र गांगुर्डे (वय ७६) यांना शुक्रवारी दोघे तरुण भेटले. विविध कंपनीमध्ये विमा कंपनीत सेंटलमेंट अधिकारी असल्याचे सांगून तुम्हाला दोन दिवसामध्ये १ लाख ३५ हजार रुपये मिळवून देतो, मार्च एन्डींगजवळ आले असल्याने सध्या विविध ऑफर आल्या आहेत, असे सांगून शासनाची बनावट कागदपत्रे दाखवली. त्यामुळे त्यांच्या विश्वास बसल्यानंतर एनएफटीद्वारे बँक खात्यावर ५२ लाख ३७ हजार रुपये भरण्यास सांगितले. खात्यावर रक्कम जमा झाल्यानंतर ते फरार झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
 

Web Title: two persons makes fraud of 52 lakhs pretending themselves as an insurance advisor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.