पश्चिम रेल्वेमार्गावर दोन नव्या ‘लेडिज स्पेशल’ गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 06:59 AM2018-12-22T06:59:20+5:302018-12-22T06:59:39+5:30

पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून नाताळाचे औचित्य साधत, महिला प्रवाशांसाठी दोन नव्या ‘लेडिज स्पेशल’ गाड्या सुरू करण्यात येणार आहेत.

 Two new Ladies Special Trains on the Western Railway Road | पश्चिम रेल्वेमार्गावर दोन नव्या ‘लेडिज स्पेशल’ गाड्या

पश्चिम रेल्वेमार्गावर दोन नव्या ‘लेडिज स्पेशल’ गाड्या

Next

मुंबई : पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून नाताळाचे औचित्य साधत, महिला प्रवाशांसाठी दोन नव्या ‘लेडिज स्पेशल’ गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गावर ‘लेडिज स्पेशल’ गाड्यांची संख्या १० झाली आहे. या दोन्ही नवीन गाड्या धिम्या मार्गावरून धावणार आहेत.
२५ डिसेंबरपासून या गाड्या नियमित धावतील. या नव्या लोकलमुळे सकाळी ८ वाजून ४४ मिनिटांची विरार स्थानकावरून सुटणारी लेडिज स्पेशल लोकल १२ मिनिटे उशिराने धावेल. ती सकाळी ८ वाजूून ५६ मिनिटांनी सुटणार आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ मे, १९९२ रोजी जगातील पहिली महिला विशेष गाडी पश्चिम रेल्वे मार्गावर सुरू करण्यात आली. सुरुवातीला चर्चगेट ते बोरीवली स्थानकादरम्यान सुरू असलेली ही सेवा १९९३ साली विरार स्थानकापर्यंत विस्तारित केली.

वेळापत्रक असे...
नवीन गाड्यांपैकी पहिली लोकल सकाळी ९.०६ वा. भार्इंदर स्थानकातून सुटेल, तर सकाळी १०.३० वा. चर्चगेट स्थानकात पोहोचेल. दुसरी गाडी सकाळी १०.०४ वा. वसई रोड स्थानकावरून सुटेल, तर सकाळी ११.३० वा. चर्चगेटला पोहोचेल.

या गाड्या केल्या रद्द
सकाळी १० वाजून २० मिनिटांची चर्चगेट-वांद्रे गाडी, तसेच सकाळी १० वाजून ५९ मिनिटांची वांद्रे-चर्चगेट गाडी रद्द करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title:  Two new Ladies Special Trains on the Western Railway Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.