दहिसरमध्ये उभारणार दोन आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 02:20 AM2018-04-11T02:20:45+5:302018-04-11T02:20:45+5:30

दहिसर पश्चिम येथील भावदेवी आणि ज्ञानधारा मैदानाचा विकास करून तेथे क्रिकेट आणि फुटबॉलपटूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Two international sports complexes to be set up at Dahisar | दहिसरमध्ये उभारणार दोन आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुले

दहिसरमध्ये उभारणार दोन आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुले

googlenewsNext

मुंबई : दहिसर पश्चिम येथील भावदेवी आणि ज्ञानधारा मैदानाचा विकास करून तेथे क्रिकेट आणि फुटबॉलपटूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर चांदिवली येथेही उद्यान विकसित करण्यात येणार आहे. मुंबईतील हे सर्वांत मोठे बहुउद्देशीय क्रीडा संकुल असेल, असा पालिकेचा दावा आहे. २०१९मध्ये या मैदानांचे द्वार खेळाडूंसाठी खुले होण्याची शक्यता आहे.
भावदेवी आणि ज्ञानधारा ही दोन मैदाने शहाजी राजे क्रीडा संकुलाच्या धर्तीवर विकसित करण्यात येणार आहे. यासाठी ठेकेदाराची लवकरच निवड करण्यात येणार आहे. ५१ हजार चौ.मी. असलेल्या या मैदानाच्या विकासासाठी तब्बल २३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यानुसार या ठिकाणी सायकल ट्रॅक, धावपट्टी, प्रेक्षकांना बसण्याची जागा, टेनिस कोर्ट, बास्केट बॉल, व्हॉलीबॉल कोर्ट, कब्बडी कोर्ट, खो-खो कोर्ट उपलब्ध करून दिले जाणार आहे.
त्याचबरोबर चांदिवली परिसरात फार्म रोडवरील टीडीआर प्लॉट या भूखंडावर महापालिका उद्यान विकसित करण्यात येणार आहे. या कामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच ठेकेदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. या भूखंडावर संरक्षक भिंत बांधणे, सुरक्षा चौकी, प्रवेशद्वार, उद्यानासाठी मातीचा भराव टाकणे, ज्येष्ठ नागरिकांची बसण्याची जागा, योगा शेड, मुलांची खेळणी, सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात येईल.
स. का. पाटील
उद्यानाचे सौंदर्यीकरण
भूमिगत जलवाहिन्यांच्या कामासाठी बोगदा बनविण्याचे काम गिरगाव येथील स.का. पाटील उद्यानातून होत आहे. यासाठी उद्यानातून मशीन टाकण्यात आल्याने या उद्यानाची दुरवस्था झाली होती. मात्र या उद्यानाचे पुन्हा सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. यासाठी उद्यानातील फुलपाखरू दालन मात्र पाडण्यात येणार आहे.
अशाही काही सुविधा
पाच कंपन्यांनी मैदान विकसित करण्यासाठी पालिकेकडे निविदा दाखल केल्या आहेत. १८ महिन्यांत मैदान तयार होणे अपेक्षित आहे. या संकुलात चार मीटर सायकलिंग ट्रॅक आणि दोन मीटर रुंद धावपट्टी असणार आहे.

Web Title: Two international sports complexes to be set up at Dahisar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.