वृद्ध दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी दोघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 02:30 AM2018-06-23T02:30:23+5:302018-06-23T02:30:26+5:30

खारमधील मखिजानी या वृद्ध दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी खार पोलिसांनी पार्वती खाका आणि तिचा पती सिंहासन इक्का या दोघांना शनिवारी अटक करण्यात आले.

Two arrested in connection with the murder of elderly couple | वृद्ध दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी दोघे अटकेत

वृद्ध दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी दोघे अटकेत

Next

मुंबई : खारमधील मखिजानी या वृद्ध दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी खार पोलिसांनी पार्वती खाका आणि तिचा पती सिंहासन इक्का या दोघांना शनिवारी अटक करण्यात आले. नागपूरहून त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून चोरीला गेलेली मालमत्तादेखील हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
खारच्या एकता एलाइट इमारतीच्या कोकीळकुंज सोसायटीत राहणाऱ्या नानक मखिजानी (८५) आणि दया मखिजानी (८०) यांचे हातपाय बांधून नंतर ओढणीने गळा दाबून हत्या करण्यात आली. ही हत्या त्यांच्या देखरेखीसाठी पंधरा दिवसांपूर्वी ठेवण्यात आलेली मोलकरीण पार्वती खाका (२०) आणि तिचा पती सिंहासन इक्का (२६) या दोघांनी केली होती. त्यानंतर घरातील लाखोंचा ऐवज घेऊन ते दोघे फरार झाले. पार्वतीची ओळख एका लग्नसमारंभात सिंहासन याच्याशी झाली होती. ही मैत्री प्रेमात बदलली. त्यानंतर त्यांनी लग्न केले. त्यांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने त्यांना पैशांची गरज होती. त्यामुळे ते दोघे मुंबईला नोकरीच्या शोधात आले आणि पार्वती ही मखिजानी यांच्या घरी काम करू लागली. त्यानंतर दोघांनी त्याच घरात चोरी करण्याचा कट रचला.
>त्या रात्री नेमके काय झाले?
गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवण झाल्यानंतर मखिजानी जोडपे झोपायला गेले. ही संधी साधत पार्वतीने घराचा दरवाजा उघडा ठेवला होता.
इमारतीच्या सुरक्षारक्षकाला चुकवत रात्री दोनच्या सुमारास सिंहासनने मखिजानी यांच्या घरात प्रवेश केला. झोपेत असलेल्या या दोन्ही वृद्धांची त्याने हत्या केली.
त्यानंतर घरातील १० लाखांचे दागिने आणि ९ हजारांची रोकड घेत पसार झाले. तेथून थेट दादर गाठत
त्यांनी ओरिसाला जाणारी एक्स्प्रेस पकडली.
>पोलीसही होते मागावर
खार पोलिसांना या हत्येची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पार्वतीचा फोटो राज्यभरातील पोलिसांना पाठवला. त्या वेळी नागपूर स्थानकावर पार्वतीला आणि सिंहासनला रेल्वे
पोलिसांनी ताब्यात घेत खार पोलिसांना कळवले.
त्यानुसार खार पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी दोघांचा ताबा घेतला. त्यांना २६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त अनिल कुंभारे यांनी सांगितले.

Web Title: Two arrested in connection with the murder of elderly couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.