उपचार अर्धवट सोडणाऱ्यांसाठी ‘क्षयरुग्ण चॅम्पियन’ मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 06:16 AM2019-05-27T06:16:54+5:302019-05-27T06:16:58+5:30

क्षयरोगाचे उपचार दीर्घकाळ चालतात. त्यामुळे बºयाचदा काही रुग्ण हे उपचार अर्धवट सोडतात.

'Tuberculosis Champion' campaign for those who quit part of the treatment | उपचार अर्धवट सोडणाऱ्यांसाठी ‘क्षयरुग्ण चॅम्पियन’ मोहीम

उपचार अर्धवट सोडणाऱ्यांसाठी ‘क्षयरुग्ण चॅम्पियन’ मोहीम

Next

मुंबई : क्षयरोगाचे उपचार दीर्घकाळ चालतात. त्यामुळे बºयाचदा काही रुग्ण हे उपचार अर्धवट सोडतात. परिणामी, क्षयरोगाचे प्रमाण वाढण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळेच आता क्षयरोगाचे उपचार पूर्ण करणाºया रुग्णांच्या साहाय्याने ‘क्षयरुग्ण चॅम्पियन’ ही मोहीम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अतिरिक्त सचिव मनोज झलानी यांनी नुकतीच या संदर्भात धारावीतील आरोग्य केंद्र आणि आरोग्यविषयक संस्थांची भेट घेतली. राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कार्यरत असणाºया सीबीनॅट साइट आणि जिल्हा डीआरटीबी सेंटरलाही भेट दिली. या भेटीदरम्यान या नव्या मोहिमेची संकल्पना त्यांनी मांडली. या वेळी कुष्ठ व क्षय कक्षाचे सहसंचालक डॉ. पद्मजा जोगेवार, शहर क्षयरोग आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा उपस्थित होत्या. त्यांनी सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचे सादरीकरण केले, त्यात देशातील सर्वाधिक एमडीआर क्षयरुग्ण मुंबईत शहरात असल्याचे निरीक्षण मांडण्यात आले आहे. या वेळी सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रणांतर्गत येणाºया आव्हानांविषयी चर्चा करण्यात आली.
>औषधे उपलब्ध
झेलानी यांनी बेडाक्विलाइन आणि डेलामॅनाइडसारख्या नवीन औषधांच्या रुग्णांच्या प्रतिसादाबद्दल यावेळी विचारले असता, डॉ. विकास ओस्वाल यांनी रुग्ण उत्तम प्रतिसाद देत असून बेडाक्विलाइनच्या दरांविषयी सादरीकरण केले. त्याचप्रमाणे, ही औषधे आता खासगी उपचार घेणाºया रुग्णांसाठीही उपलब्ध असल्याचे नमूद केले. या वेळी तज्ज्ञांकडून क्षयरोग मुक्त मुंबई २०१९-२०२५ या पंचवार्षिक योजनेच्या कामाचा आढावा घेण्यात आला.

Web Title: 'Tuberculosis Champion' campaign for those who quit part of the treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.