मुंबई महापालिकेत नियुक्त्यांसह बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 04:16 AM2019-06-07T04:16:26+5:302019-06-07T04:16:33+5:30

रुग्णालय विभागाच्या सहायक आयुक्त अलका ससाणे यांची ई विभागाच्या सहायक आयुक्तपदाचा तर, ई विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त नितीन आर्ते यांच्याकडे ए विभागाचा सहायक आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे

Transfers with the appointments in Mumbai Municipal Corporation | मुंबई महापालिकेत नियुक्त्यांसह बदल्या

मुंबई महापालिकेत नियुक्त्यांसह बदल्या

Next

मुंबई : मुंबई महापालिका परिमंडळ-३ चे उपायुक्त आनंद वागराळकर यांची अतिक्रमण निर्मूलनच्या उपआयुक्त, विशेष उपआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. मालमत्ता विभागाचे सहायक आयुक्त पराग मसुरकर यांची परिमंडळ-३ च्या उपआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

रुग्णालय विभागाच्या सहायक आयुक्त अलका ससाणे यांची ई विभागाच्या सहायक आयुक्तपदाचा तर, ई विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त नितीन आर्ते यांच्याकडे ए विभागाचा सहायक आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. याचप्रमपणे ए विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांची जी/उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जी/उत्तरचे प्रभारी सहायक आयुक्त अशोक खैरनार यांची एच/पूर्वच्या सहायकपदी बदली करण्यात आली असून, एच/पूर्वचे गजानन बेल्लाळे यांची एफ/उत्तरच्या सहायक आयुक्तपदी, एफ/उत्तरचे सहायक आयुक्त केशव उबाळे यांची मालमत्ता विभागाच्या सहायक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Transfers with the appointments in Mumbai Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.