मंबई विद्यापीठाकडून कर्मचा-यांना प्रशिक्षण, आॅनलाइन तपासणीतले अडथळे दूर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 04:05 AM2017-12-23T04:05:19+5:302017-12-23T04:35:53+5:30

मार्च-एप्रिल महिन्यांत झालेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाइन पद्धतीने करण्यात आली. या वेळी झालेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत झालेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाइन पद्धतीने करण्यात येत आहे.

 Training of staff from Mumbai University, removal of online check barriers | मंबई विद्यापीठाकडून कर्मचा-यांना प्रशिक्षण, आॅनलाइन तपासणीतले अडथळे दूर करणार

मंबई विद्यापीठाकडून कर्मचा-यांना प्रशिक्षण, आॅनलाइन तपासणीतले अडथळे दूर करणार

Next

मुंबई : मार्च-एप्रिल महिन्यांत झालेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाइन पद्धतीने करण्यात आली. या वेळी झालेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत झालेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाइन पद्धतीने करण्यात येत आहे. पण, या वेळी अडचणी येऊ नयेत म्हणून विद्यापीठाने शुक्रवारी सर्व कॅप सेंटरमधील आयटी विभागातील कर्मचा-यांना प्रशिक्षण दिले.
उत्तरपत्रिका तपासणीत आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे एप्रिल महिन्यात झालेल्या परीक्षांचे निकाल लागण्यात सप्टेंबर महिना उजाडला. पण, या महिन्याला वर्षभराचे कंत्राट दिले असल्याने आणि या परीक्षांसाठी वेळ कमी असल्याने त्याच कंपनीच्या यंत्रणेद्वारे पेपर तपासण्याचा निर्णय आता विद्यापीठाने घेतला आहे. यामुळे आता या वेळी येणाºया संभाव्य अडचणी टाळण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे.

Web Title:  Training of staff from Mumbai University, removal of online check barriers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.