मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाची ‘ट्रिंग ट्रिंग’ वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 06:50 AM2018-06-19T06:50:32+5:302018-06-19T06:50:32+5:30

पोलीस नियंत्रण कक्षाकडे मदतीसाठी आणि तक्रारींसाठी येणाऱ्या कॉलच्या संख्येत २०१६ च्या तुलनेत २०१७ साली दुपटीने वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.

 Traffic trunk of the Mumbai Police Control Cell increased | मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाची ‘ट्रिंग ट्रिंग’ वाढली

मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाची ‘ट्रिंग ट्रिंग’ वाढली

Next

मुंबई : पोलीस नियंत्रण कक्षाकडे मदतीसाठी आणि तक्रारींसाठी येणाऱ्या कॉलच्या संख्येत २०१६ च्या तुलनेत २०१७ साली दुपटीने वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. आरटीआयमध्ये मिळालेल्या या माहितीमध्ये २०१६ साली १०० व १०३ क्रमांकाच्या पोलीस हेल्पलाइनवर तब्बल ७४ लाख १४ हजार ३९५ कॉल आले होते. मात्र २०१७ साली केवळ १० महिन्यांत या कॉलच्या संख्येत दुपटीने वाढ झाली असून तक्रार आणि मदतीसाठी नागरिकांनी तब्बल १ कोटी ५८ लाख ८२ हजार १२२ कॉल केल्याची माहिती आहे.
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी यासंदर्भातील माहिती अर्ज दाखल केला होता. त्यात मिळालेल्या माहितीनुसार, तक्रार नोंदविण्यासाठी आणि मदतीसाठी २०१६ साली १०० क्रमांकावर ७२ लाख ७८ हजार ४६ कॉल, तर १०३ क्रमांकावर १ लाख २६ हजार ३४९ कॉल आले होते. याउलट २०१७ सालातील मार्च आणि एप्रिल महिना वगळल्यास उरलेल्या १० महिन्यांत १०० क्रमांकावर १ कोटी ५८ लाख ५ हजार ७९१ कॉल आले. तर १०३ क्रमांकावर आलेल्या कॉलची संख्या केवळ ७६ हजार ३३१ इतकी होती. यावरून पोलिसांच्या १०० क्रमांक या हेल्पलाइनवर मदतीसाठी आणि तक्रारीसाठी येणाºया कॉलच्या संख्येत दुपटीने वाढ झाल्याचे निदर्शनास येते. तर १०३ क्रमांकावर येणाºया कॉलच्या संख्येत काही प्रमाणात घट झाली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे कॉलच्या संख्येत वाढ होत असली, तरी कॉल करणाºया व्यक्तीपर्यंत किती वेळात मदत पोहोचवली जाते, याबाबतची माहिती पोलिसांकडे नाही. शिवाय नियंत्रण कक्षामध्ये फोन करणाºया व्यक्तीची माहिती स्थानिक पोलिसांकडे पाठविली जात असल्याचेही नियंत्रण कक्षाने सांगितले आहे. मात्र त्यामुळे तक्रारदार व मदत मागणाºया व्यक्तीच्या जिवाला धोका निर्माण होत असल्याचा आरोप शेख यांनी केला आहे. याआधी दोन प्रकरणांत गैरप्रकाराची तक्रार केल्यानंतर संबंधित आरोपींवर कारवाई झाली होती. मात्र कारवाई होणाºया व्यक्तीकडून शेख यांना धमकावण्यात आले होते. परिणामी, स्थानिक पोलिसांमधून तक्रारदाराची माहिती उघड केली जात
असल्याचा निष्कर्षही शेख यांनी लावला आहे.
>माहिती गुप्त ठेवणे गरजेचे
एखाद्या ठिकाणी गैरप्रकार सुरू असल्यास त्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शी पोलिसांना देतात. मात्र प्रामाणिकपणे तक्रार करणाºया व्यक्तींच्या गोपनीयतेचा खुलासा पोलिसांकडून केला जात असेल, तर पोलिसांना मदत किंवा सूचना कोण करणार, असा सवाल शेख यांनी उपस्थित केला आहे. तसेच कोणत्याही घटनेबाबत कॉल करून नियंत्रण कक्षाला मदत करणाºया नागरिकांची माहिती गुप्त ठेवण्याची मागणीही शेख यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली आहे.

Web Title:  Traffic trunk of the Mumbai Police Control Cell increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.