रेल्वे पुलांच्या कामासाठी ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक वाढणार; लष्कराला माहिती देण्यासाठी समिती स्थापन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:46 PM2017-10-31T23:46:37+5:302017-10-31T23:46:49+5:30

उपनगरीय मार्गावरील एल्फिन्स्टन रोड स्थानकासह करीरोड आणि आंबिवली स्थानकावर पादचारी पूल उभारण्यात येणार आहेत. यासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

Traffic, power block for rail bridge construction will increase; The committee will be formed to inform the army | रेल्वे पुलांच्या कामासाठी ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक वाढणार; लष्कराला माहिती देण्यासाठी समिती स्थापन करणार

रेल्वे पुलांच्या कामासाठी ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक वाढणार; लष्कराला माहिती देण्यासाठी समिती स्थापन करणार

Next

- एल्फिन्स्टन, करीरोड, आंबिवली स्थानकांवर नवीन पूल 

मुंबई : उपनगरीय मार्गावरील एल्फिन्स्टन रोड स्थानकासह करीरोड आणि आंबिवली स्थानकावर पादचारी पूल उभारण्यात येणार आहेत. यासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. लष्करातील अधिकाºयांना रेल्वे स्थानकाबाबत माहिती देण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. ब्लॉक संदर्भात महापालिकेसह तातडीची बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीनंतर ब्लॉकबाबत सविस्तर माहिती देण्यात येईल, अशी माहिती मंगळवारी रात्री उशिरा पश्चिम रेल्वेच्या वतीने देण्यात आली.
लष्कराला स्थानकातील परिसराची माहिती देण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल. यात मध्य, पश्चिम रेल्वेचे अधिकारी असतील. समितीबाबत रेल्वे प्रशासनाने अधिक माहिती देण्यास नकार दिला. मात्र, स्थानकातील तांत्रिक बाबींसह अन्य माहिती ही समिती लष्करी अधिकाºयांना देईल, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. पूल उभारण्यासाठी ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे रेल्वे मार्गावरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक वाढण्याची शक्यता आहे. दादर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे भविष्यात ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

रेल्वे अभियंत्यांमध्ये नाराजी : तथापि, लष्करी अधिकाºयांच्या बोलाविण्यामुळे रेल्वेतील वरिष्ठ अधिकाºयांनी नाराजी व्यक्त केली आहे. रेल्वेतदेखील दर्जेदार अभियंता आहेत. मात्र, प्रत्यक्षात ब्लॉकची अडचण असल्यामुळे रेल्वे अभियंता हतबल आहेत. ब्लॉक योग्य वेळी उपलब्ध करून दिल्यास, रेल्वेचे अभियंतादेखील पादचारी पूल कमी कालावधीत उभारू शकतात, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Traffic, power block for rail bridge construction will increase; The committee will be formed to inform the army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.