टॉरेन्टला व्यवसायविक्रीस युनिकेम बोर्डाची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 05:23 AM2017-11-06T05:23:42+5:302017-11-06T05:23:42+5:30

युनिकेम लॅबोरेटरिज लि.च्या भारत व नेपाळमधील औषध उत्पादन, विक्री व वितरणाच्या व्यवसायाची अनुषंगिक मालमत्ता व कर्मचा-यांसह टॉरेन्ट फार्मास्युटिकल्स लिमिटेडला विक्री

Torrent approves businessweek Unichem board | टॉरेन्टला व्यवसायविक्रीस युनिकेम बोर्डाची मंजुरी

टॉरेन्टला व्यवसायविक्रीस युनिकेम बोर्डाची मंजुरी

Next

मुंबई : युनिकेम लॅबोरेटरिज लि.च्या भारत व नेपाळमधील औषध उत्पादन, विक्री व वितरणाच्या व्यवसायाची अनुषंगिक मालमत्ता व कर्मचा-यांसह टॉरेन्ट फार्मास्युटिकल्स लिमिटेडला विक्री व हस्तांतरण करण्याच्या व्यवहारास युनिकेम कंपनीच्या संचालक मंडळाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली.
या व्यवहार एकूण ३,६०० कोटी रुपयांचा असून त्यासंधीच्या अटी व शर्ती दोन्ही कंपन्यांनी वाटाघाटी करून याआधीच ठरविल्या असून त्यासंबंधीचे औपचारिक करार लवकरच केले जातील. या व्यहारामुळे युनिकेमचे भारत व नेपाळमधील अनेक ब्रॅण्ड, सिक्किममधील कारखाना व या व्यवसायाशी संबंधित कर्मचारी टॉरेन्ट कंपनीकडे हस्तांतरित होतील.
भागधारकांच्या संमतीसह अन्य वैधानिक मंजुºया मिळून डिसेंबर २०१७ अखर हा व्यवहार पूर्ण होईल. त्यानंतरही युनिकेम ही शेअर बाजारातील लिस्टेट कंपनी म्हणून कायम राहील व तिच्या सध्याच्या भागभांडवल रचनेत त्याने काही फेरबदल होणार नाहीत, असे कंपनीने म्हटले आहे.
कंपनीच्या पत्रकानुसार या व्यवसाय हस्तांतरणानंतरही युनिकेम कंपनीकडे पुढील गोष्टी कायम राहतील-गोवा, गाझियाबाद व बिद्दी येथील फॉर्म्युलेशन कारखाने, रोहा, कोल्हापूर व पिठमपूर येथील एपीआय कायरखाने, गोव्यातील सेंटर आॅफ एक्सलन्स व बायो रीसर्च सेंटर, आंतरराष्ट्रीय व्यवसाय, याच्याशी संबंधित कर्मचारी व कांदिवली, मुंबई येथील मुख्य कार्यालय.
हा व्यवहार यशस्वी होण्यात जयेंद्र शहा यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यांनी वाटाघाटी, मूल्यांकन व व्यवहार या बाबतीत युनिकेमचे एकमेव सल्लागार म्हणून भूमिका बजावली. ए,एन. शहा असोसिएट््स या चार्टर्ड अकाऊंटन्ट फर्मने कर व संबंधित बाबींचे सल्लागार तर ट्रान्स कॉन्टिनेंटल कॅपिटल अ‍ॅडव्हायजर्स प्रा.लि.ने स्ट्रॅटेजिक सल्लागार म्हणून काम पाहिले.

Web Title: Torrent approves businessweek Unichem board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.