उद्या म्हाडाच्या घरांची लॉटरी!

By admin | Published: May 30, 2015 02:02 AM2015-05-30T02:02:33+5:302015-05-30T02:02:33+5:30

म्हाडाच्या एकूण १ हजार ६३ घरांसाठीची लॉटरी ३१ मे रोजी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सकाळी १० वाजता काढण्यात येणार असून, या घरांसाठी १,२५,८८४ अर्जदार पात्र ठरले आहेत.

Tomorrow's house Lottery! | उद्या म्हाडाच्या घरांची लॉटरी!

उद्या म्हाडाच्या घरांची लॉटरी!

Next

मुंबई : म्हाडाच्या एकूण १ हजार ६३ घरांसाठीची लॉटरी ३१ मे रोजी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सकाळी १० वाजता काढण्यात येणार असून, या घरांसाठी १,२५,८८४ अर्जदार पात्र ठरले आहेत.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ९९७ सदनिका आणि अंध, अपंग प्रवर्गासाठी मुंबई-कोकण मंडळाच्या ६६ सदनिकांसाठी ही लॉटरी काढण्यात येणार आहे. या लॉटरीत अत्यल्प उत्पन्न गटाकरिता मालवणी मालाडमध्ये २३२, गोरेगावमधील उन्नत नगर येथे ९४, अल्प उत्पन्न गटासाठी मानखुर्दमध्ये ६६, मुलूंडमधील गवाणपाडा येथे १८२, गोरेगाव उन्नत नगर येथे १८२ तर मध्यम उत्पन्न गटासाठी मुलूंडमधील गवाणपाडा येथे १८५ आणि सायनमधील प्रतीक्षा नगर येथे ५६ अशा एकूण ९९७ सदनिका आहेत.

लॉटरीचा निकाल पाहण्यास अर्जदारांना सभागृहात उपस्थित राहता येईल. सभागृहाबाहेर घातलेल्या मंडपातील मोठया पडद्यावरही निकाल पाहता येईल. लॉटरीसाठी उपस्थित राहणाऱ्या अर्जदारांना प्रवेशिका देण्याची व्यवस्था ३१ मे रोजी रंगशारदा येथे करण्यात आली आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने प्रवेशिकांचे वाटप केले जाईल. प्रवेशिका घेण्यासाठी अर्जदाराने ओळखपत्र, अर्जाची मूळ पावती सोबत आणावी.

लॉटरीची वेळ :
सकाळी १० ते दुपारी १२.३०
योजनेचा संकेत क्रमांक
३१०, ३११, ३१२, ३१३, ३१४, ३१५, ३१६ या क्रमाने...

Web Title: Tomorrow's house Lottery!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.