आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’, कुर्ला-पनवेल विशेष लोकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 12:34 AM2018-06-03T00:34:40+5:302018-06-03T00:34:40+5:30

सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर, रुळांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाईल.

Today, 'Mega Blocks', Kurla-Panvel Special Local on all the three routes of the train | आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’, कुर्ला-पनवेल विशेष लोकल

आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’, कुर्ला-पनवेल विशेष लोकल

Next

मुंबई : सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर, रुळांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाईल.
माटुंगा ते ठाणे डाउन धिम्या मार्गावर रविवारी सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाईल. या कालावधीत माटुंगा ते ठाणे स्थानकावरील डाउन धिम्या मार्गावरील वाहतूक डाउन जलद मार्गावर वळविण्यात येईल. सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकावर गाड्या थांबतील. या गाड्या पुढे मुलुंड स्थानकावरून डाउन धिम्या मार्गावर चालविण्यात येतील.
या कालावधीत विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर, स्थानकांवर गाड्या थांबणार नाहीत. दरम्यान, मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकावर सकाळी १०.३० ते दुपारी २.२० वाजेपर्यंत जुन्या पादचारी पुलाचे काम
केले जाणार आहे.
सकाळी १०.५४ ते दुपारी ३.०६ वाजेपर्यंत कल्याणवरून सुटणाऱ्या अप जलद गाड्या निर्धारित स्थानकाव्यतिरिक्त दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकावर थांबतील, तसेच सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणाºया डाउन जलद गाड्या निर्धारित स्थानकाव्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा या स्थानकांवर थांबतील. त्यामुळे त्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावतील.
पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते गोरेगावपर्यंत सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत दोन्ही मार्गांवर ब्लॉक घेण्यात येईल. या कालावधीत सर्व जलद गाड्या सांताक्रुझ ते गोरेगावदरम्यान धिम्या मार्गांवर धावतील, तसेच
काही लोकल रद्द केल्या जाणार आहेत.

एक्स्प्रेस, मेल गाड्यांचे वेळापत्रक
रविवारी डाउन ट्रेन १७२२२ लोकमान्य टिळक टर्मिनस ते काकीनाडा एक्स्प्रेस १६३३९, मुंबई- तिरुनेलवेली नागरकोईल एक्स्प्रेस आणि १७०३१ मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेसला कर्जत-पनवेल मार्गावर चालविण्यात येईल. ही गाडी लोणावळा २५ ते ३० मिनिटे उशिराने पोहोचेल.
गाडी क्रमांक १६३३९ आणि १७०३१ या गाड्यामध्ये कल्याणहून प्रवास करणाºया प्रवाशांनी दिवा स्थानकावरून गाडी पकडावी. अप गाडी १७०३२ हैदराबाद-मुंबई एक्स्प्रेस, ११०४२ चेन्नई-मुंबई एक्स्प्रेस आणि ११०१४ कोइम्बतूर-लोकमान्य टिळक टर्मिनस कल्याण-पनवेल मार्गावर वळविण्यात येईल, तसेच कल्याणवरून प्रवास करणाºया प्रवाशांनी दिवा स्थानकावरून गाडी पकडावी.

कुर्ला-पनवेल विशेष लोकल
हार्बर मार्गावर सीएसएमटी-चुनाभट्टी-वांद्रेदरम्यान अप-डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. या कालावधीत प्रवाशांच्या सुविधेसाठी कुर्ला ते पनवेलपर्यंत विशेष लोकल चालवल्या जातील. ट्रान्सहार्बर आणि मध्य रेल्वेवरून हार्बर मार्गावर प्रवास करणाºयांना सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत त्याच तिकीट अथवा पासावर प्रवास करण्यास मुभा आहे.

Web Title: Today, 'Mega Blocks', Kurla-Panvel Special Local on all the three routes of the train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.