आज शेवटची लोकल दादरहून

By admin | Published: September 5, 2015 02:19 AM2015-09-05T02:19:40+5:302015-09-05T02:19:40+5:30

करी रोड स्थानकाजवळ एमएमआरडीएकडून मोनो रेल्वेचा गर्डर टाकण्याचे काम ५ सप्टेंबरच्या मध्यरात्री साडे बारापासून करण्यात येणार आहे. हे काम सकाळी साडे पाच वाजेपर्यंत चालणार असून

Today the last local will be from Dadar | आज शेवटची लोकल दादरहून

आज शेवटची लोकल दादरहून

Next

मुंबई : करी रोड स्थानकाजवळ एमएमआरडीएकडून मोनो रेल्वेचा गर्डर टाकण्याचे काम ५ सप्टेंबरच्या मध्यरात्री साडे बारापासून करण्यात येणार आहे. हे काम सकाळी साडे पाच वाजेपर्यंत चालणार असून, त्या कामासाठी ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे.
त्यासाठी लोकल फेऱ्यांमध्ये बदल करण्यात आले असून, सीएसटीहून रात्री साडे बारा वाजता सुटणारी कर्जत धीमी लोकल दादर स्थानकातून मध्यरात्री १२.४८ वाजता सुटेल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. तर सीएसटीहून शेवटची लोकल मध्यरात्री १२.१0 वाजता कसारासाठी सुटेल.
या कामासाठी मध्य रेल्वेकडून ११ लोकल फेऱ्या रद्द
करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ब्लॉक संपताच सीएसटीहून अंबरनाथसाठी पहिली लोकल सकाळी ५.४८ वाजता सोडण्यात येईल. तर ट्रॅफिक ब्लॉक सुरू होण्यापूर्वी सीएसटीसाठी शेवटची लोकल कर्जतहून 00.२५ वाजता सुटेल. ब्लॉक संपल्यानंतर कर्जतहून सीएसटीसाठीची पहिली लोकल सकाळी ६ वाजता सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

या कामासाठी सीएसटीपर्यंत धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेस ट्रेन दादरपर्यंतच चालविण्यात येणार आहेत. यामध्ये चेन्नई सेंट्रल-मुंबई मेल, भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस, कन्याकुमारी-मुंबई एक्स्प्रेस, साईनगर शिर्डी-मुंबई पॅसेंजर व सिकंदराबाद-मुंबई देवगिरी एक्स्प्रेसचा समावेश आहे.
६ सप्टेंबरच्या रद्द लोकल
सीएसटीहून मध्यरात्री सुटणारी 00.२३ वाजताची ठाणे लोकल
ठाणे स्थानकातून सुटणारी 0४.0५, ४.३९ वाजता, 0५.0८ वाजता आणि 0५.३१ वाजताची लोकल.
कुर्लाहून सुटणारी 0५.५४ वाजताची

५ सप्टेंबरला सीएसटीहून
रद्द केलेल्या लोकल

21.41ढट
कल्याण लोकल

23.39ढट
कुर्ला लोकल

23.25ढट
कुर्ला लोकल

23.59ढट
ठाणे लोकल

अंशत: रद्द करण्यात आलेल्या लोकल
4.12
वाजताची सीएसटी-कसारा, ४.२५ वाजताची सीएसटी-खोपोली लोकल, ४.५0 वाजताची सीएसटी-कर्जत लोकल, ५.0२ वाजताची सीएसटी-कसारा लोकल दादरमधून सुटेल.

शेवटची मध्यरात्री 00.५९ वाजताची खोपोली-सीएसटी लोकल, 0१.१४ वाजताची कसारा-सीएसटी लोकल, 0१.३८ वा.ची बदलापूर-सीएसटी लोकल दादरपर्यंत धावेल.

सकाळी सीएसटीच्या दिशेने येणाऱ्या लोकलमध्ये ४.५८ची कर्जत-सीएसटी लोकल, स. ५.१६ वा.ची ठाणे ते सीएसटी लोकल, ५.२६ वा.ची अंबरनाथ-सीएसटी लोकल, ५.४४ वाजताची टिटवाळा-सीएसटी लोकलही दादरपर्यंतच धावेल.

सीएसटीहून आसनगावसाठी सुटणारी ५.१४ वाजताची लोकल कुर्ला येथून सुटेल.

५.३0 वाजता सीएसटी-टिटवाळा व ६.0४ वा.ची सीएसटी-कल्याण लोकल मुंब्राहून सोडण्यात येतील.

Web Title: Today the last local will be from Dadar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.