Three thousand 'Tali Ram' detention across the state, there has been a rave party in Goa | राज्यभरात तीन हजार ‘तळीराम’ कोठडीत, गोव्यात रेव्ह पार्ट्या झाल्याचा संशय  

मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत करताना कायद्याला न जुमानता झिंगून वाहन चालविणाºया सुमारे तीन हजार तळीरामांना नववर्षाचा पहिलाच दिवस पोलीस कोठडीत काढावा लागला. गोव्यात काही ठिकाणी रेव्ह पार्ट्याही झाल्याची माहिती मिळाल्याने पोलीस त्यादृष्टीने शोध घेत आहेत.
मद्य पिऊन गाडी चालविणाºयांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी राज्यभर तपासणी मोहीम राबविली. ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’ने ठिकठिकाणी तपासणी केली जात होती. विशेषत: रात्री बारानंतर ही मोहीम तीव्र करण्यात आली होती.

गोव्यात समुद्रकिनारी दारूचा महापूर

नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यातील सर्व समुद्रकिनारी दिवाळीसारखे वातावरण होते. झगमगाटाने किनारे बेधुंद झालेले होते. दारूचा महापूर वाहत होता.
पर्यटकांच्या तोबा गर्दीमुळे जत्रा फुललेली होती. पहाटेपर्यंत या जत्रेने जल्लोष साजरा केला. मिरामार समुद्रकिनारी तर खुलेआम बीयरच विकली जात होती. सालाबादप्रमाणे पोलिसांच्या कारवाईच्या घोषणा हवेत विरल्या आणि तळीरामांनी दंगा केला. बहुतेक समुद्रकिनारी दुसºया दिवशी बाटल्यांचा खच पडलेला होता.

अशी झाली कारवाई

मुंबई ६१५
ठाणे १३६६
पालघर १४९
रत्नागिरी ४४
सिंधुदुर्ग ८
रायगड ३
वर्धा १४
भंडारा ७
यवतमाळ ६५
गोंदिया १८
बुलडाणा २९
कोल्हापूर ४०
सांगली ९२

सोलापूर ३०
नाशिक ११०
जळगाव ५०
धुळे २६
नंदुरबार १७
बीड २६
लातूर ०१
उस्मानाबाद ०१
जालना ०४
परभणी ४८
हिंगोली २०
नांदेड १५
सातारा ६८


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.