तिघा चोरटय़ांना अटक

By Admin | Published: June 25, 2014 12:04 AM2014-06-25T00:04:28+5:302014-06-25T00:04:28+5:30

कोपरखैरणो पोलिसांनी सोनसाखळी चोरी करणा:या तीन आरोपींना अटक केली आहे. तिघांकडून साडेचार तोळे वजनाचे दागिने जप्त केले आहेत.

Three thieves arrested | तिघा चोरटय़ांना अटक

तिघा चोरटय़ांना अटक

googlenewsNext

शिरीष शिंदे , बीड
कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवणाऱ्यां पोलिसांच्या पदरी नेहमी निराशाच येते. कधी अनियमित ड्युटीचे टेंशन तर कधी झोप सोडून रात्री-अपरात्री उठून जाण्याचे टेंशन. पोलिसांचे आयुष्य जवळपास तणावाचे असते. पोलिस कर्मचाऱ्यांच्या समस्या सुरु होतात त्या घरापासून. त्यांच्या निवासस्थानाची एवढी दुरवस्था झाली आहे की, त्यांना तेथे राहणेही कठीण बनले आहे. पर्याय नसल्याने अनेकांना समस्यांना तोंड देत क्वार्टरमध्ये रहावे लागत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणी दरम्यान समोर आले आहे.
पोलिस प्रशासनाच्यावतीने पोलिसांना राहण्यासाठी शहरात चार ठिकाणी क्वार्टर्स आहेत. पोलिस मुख्यालय परिसरात असलेली क्वार्टर्स जवळपास पन्नास वर्षापूर्वी बांधण्यात आलेली आहेत. या ठिकाणी ए ते झेड अशी नावे असलेल्या २६ कॉलनी आहेत. प्रत्येक कॉलनीमध्ये एकूण १० घरे आहेत. या ठिकाणचे बांधकाम आता जुने झाले असून मोडकळीस आल्याने तेथे राहत असलेल्या पोलिसांना अनेक समस्यांचा सामाना करावा लागत आहे. भाड्याच्या ठिकाणी अधिक पैसे घेतली जात असल्याने पोलिस पर्याय नसल्याने येथेच राहत आहेत.
दारे, शौचालयाची दारे तुटलेली
पोलिस मुख्यालय परिसरातील घरांची परझड झाली असून पोलिस राहत असलेल्या घरांची दारे अर्धी तुटलेली आहेत. यामुळे पोलिसांच्या घरी चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिस कुटुंबिय गावाला गेल्यास चोरट्यांना सहज तोडता येतील अशी दारांची अवस्था झाली आहे. दुसरी बाब म्हणजे, शौचालयाच्या दारांची अशीच स्थिती आहे. दाराची डागडुजी स्वखर्चातून पोलिसांना करावा लागत आहे.
नाल्या तुंबल्या, दुर्गंधीही वाढली
पोलिसांच्या निवासस्थान परिसरात नाल्या तुंबल्या आहेत. या भागातील नाल्या नियमित साफ केल्या जात नसल्याने परिसरात दुर्गंधी वाढत चालली आहे. परिणामी पोलिस कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक समस्यांचा सामाना करत पोलिसांना आहे त्याच ठिकाणी राहावे लागत आहे.
अनेक निवासस्थाने रिकामीच
पोलिस मुख्यालयावरील निवासस्थाने समस्यांचे माहेरघर बनले असल्याने अनेक पोलिस येथे राहण्यास येत नसल्याची बाब समोर आली आहे. सी व डी भागातील घरे रिकामी असून त्यांची दारे, खिडक्या तुटलेल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पोलिस निवासस्थानाच्या डागडुजीचा विषय येतो मात्र याकडे लक्ष दिले नाही. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. (भाग -१़)

Web Title: Three thieves arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.