अनंत चतुर्दशीला सायंकाळी ५ ते १० पर्यंत चर्नी रोडवर धिम्या लोकलला थांबा नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 06:07 AM2018-09-21T06:07:44+5:302018-09-21T06:07:53+5:30

विसर्जनानिमित्त होणारी गर्दी टाळण्यासाठी अनंत चतुर्दशीला सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत चर्नी रोड स्थानकात अप मार्गावरील धिम्या लोकलला थांबा न देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.

There is no stop on the Churni road from Anant Chaturdashi to 5 to 10 on Churni Road | अनंत चतुर्दशीला सायंकाळी ५ ते १० पर्यंत चर्नी रोडवर धिम्या लोकलला थांबा नाही

अनंत चतुर्दशीला सायंकाळी ५ ते १० पर्यंत चर्नी रोडवर धिम्या लोकलला थांबा नाही

Next

मुंबई : विसर्जनानिमित्त होणारी गर्दी टाळण्यासाठी अनंत चतुर्दशीला सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत चर्नी रोड स्थानकात अप मार्गावरील धिम्या लोकलला थांबा न देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. तर प्रवाशांच्या सोईसाठी ५ वाजून ३० मिनिटे ते ८ वाजून ३० मिनिटांपर्यंत सर्व अप जलद लोकल मुंबई सेंट्रल ते चर्चगेट स्थानकांदरम्यान थांबविण्यात येतील.
चर्नी रोड स्थानकातील फलाट क्रमांक २ वरील अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी अप दिशेकडील सर्व धिम्या लोकलचा चर्नी रोड स्थानकातील थांबा रद्द करण्यात आला आहे.
यामुळे फलाट क्रमांक
२ वरून कोणतीही लोकल उपलब्ध नसेल. तर प्रवाशांच्या सोईसाठी सायंकाळी गर्दीच्या वेळेत ५ वाजून ३० मिनिटे ते ८ वाजून ३० मिनिटांपर्यंत सर्व अप जलद लोकल मुंबई सेंट्रल ते चर्चगेट स्थानकांदरम्यान थांबविण्यात येणार असल्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.

Web Title: There is no stop on the Churni road from Anant Chaturdashi to 5 to 10 on Churni Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :localलोकल