भारतीय चित्रपटांत सकारात्मक बदल घडत आहेत : नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 06:35 AM2019-01-20T06:35:43+5:302019-01-20T06:37:39+5:30

आजवर देशातली गरिबी आणि असहायता हेच आपण सिनेमातून पाहिले होते, आता सिनेमा समस्याच मांडत नाहीत, तर त्यावरचे उपायही सांगतो.

There are positive changes in Indian films: Narendra Modi | भारतीय चित्रपटांत सकारात्मक बदल घडत आहेत : नरेंद्र मोदी

भारतीय चित्रपटांत सकारात्मक बदल घडत आहेत : नरेंद्र मोदी

Next

मुंबई : आजवर देशातली गरिबी आणि असहायता हेच आपण सिनेमातून पाहिले होते, आता सिनेमा समस्याच मांडत नाहीत, तर त्यावरचे उपायही सांगतो. हे समाजाच्या बदलत्या स्थितीचेच द्योतक असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मुंबईत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन करताना व्यक्त केली.
मोदी म्हणाले की, मी जगातील नेत्यांना भेटतो. त्यापैकी अनेकांनी भारतीय गाणी येत असल्याचे सांगितले. ही आपली ताकद आहे. या संग्रहालयामुळे नव्या पिढीला सिनेमाच्या गौरवशाली इतिहासाची माहिती मिळेल. सोहळ्यास मनोजकुमार, आशा भोसले, श्याम बेनेगल, रणधीर कपूर, जितेंद्र, ए. आर. रहमान, आमीर खान हजर होते.
फिल्म्स डिव्हिजनच्या गुलशन महल आणि नवीन इमारत अशा दोन वास्तूंमध्ये हे संग्रहालय आहे. भारतीय चित्रपटांच्या इतिहासाचे दर्शन घडविण्याबरोबरच देशाचा सामाजिक-सांस्कृतिक इतिहास चित्रपटांच्या माध्यमातून या संग्रहालयात उलगडण्यात आला आला आहे. दृश्ये, ग्राफिक्स, चित्रपटविषयक कात्रणे, साहित्य आदींसह हा प्रवास रसिकांना अनुभवता येईल.
संग्रहालयात गांधी व चित्रपट, बाल चित्रपट स्टुडिओ, तंत्रज्ञान, सर्जनशीलता आणि भारतीय चित्रपट, भारतातले चित्रपट असे विभाग आहेत. शिवाय डिजिटल सिनेमा प्रोजेक्टर आणि ७.१ सराउंड ध्वनी यंत्रणेने सुसज्ज अशी दोन प्रेक्षागृहेही आहेत.
>विरोधकांची खिल्ली
सिल्व्हासा : एकमेकांची तोंडे न पाहणारे आज एकत्र आले आहेत, या शब्दांत मोदी यांनी कोलकात्यातील मेळाव्याची खिल्ली उडविली. ते म्हणाले की, ज्यांनी लोकशाहीवर गदा आणली, तेच आता लोकशाहीच्या नावाने गळा काढत असल्याचे पाहून लोक त्यांना हसतील.

Web Title: There are positive changes in Indian films: Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.