मुंबई उपनगर जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघांत ७० लाख मतदार, ४८१ तृतीयपंथी मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 01:05 AM2019-03-13T01:05:11+5:302019-03-13T01:05:37+5:30

लोकसभा निवडणूकीच्या तयारीसाठी प्रशासनाची जोरदार तयारी सुरु झाली असून मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी विविध राजकीय पक्षांसोबत बैठक घेऊन त्यांना आचारसंहिता व इतर बाबींविषयी माहिती देण्यात आली.

There are 70 lakh voters in the 4 Lok Sabha constituencies of Mumbai Suburban District, 481 Third Voters | मुंबई उपनगर जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघांत ७० लाख मतदार, ४८१ तृतीयपंथी मतदार

मुंबई उपनगर जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघांत ७० लाख मतदार, ४८१ तृतीयपंथी मतदार

Next

मुंबई : लोकसभा निवडणूकीच्या तयारीसाठी प्रशासनाची जोरदार तयारी सुरु झाली असून मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी विविध राजकीय पक्षांसोबत बैठक घेऊन त्यांना आचारसंहिता व इतर बाबींविषयी माहिती देण्यात आली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

मुंबई उपनगर जिल्ह्याच्या हद्दीतील चार लोकसभा मतदारसंघात ७० लाख १९०० मतदार असून त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ३८ लाख १५ हजार २७१ , स्त्री मतदारांची संख्या ३१ लाख ८६ हजार १४८ व तृतीयपंथी मतदारांची संख्या ४८१ आहे. ७ हजार २९७ मतदान केंद्रांच्या माध्यमातून हे मतदान होणार आहे. केबल, दूरचित्रवाणी, सोशल मीडिया व इतर दृकश्राव्य माध्यमांद्वारे प्रसारित करावयाच्या जाहिरातींची पडताळणी व परवानगी साठी मीडिया सर्टिर्फिकेशन व मॉनिटरिंग कमिटी स्थापन करण्यात आली आहे.

७ हजार २९७ मतदान केंद्रांच्या माध्यमातून होणाऱ्या या प्रक्रियेला पार पाडण्यासाठी सुमारे ६० हजार कर्मचारी कार्यरत राहणार असून त्यासाठी सुमारे २ हजार ५०० पेक्षा जास्त वाहने ताब्यात घेण्यात आली असल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे उप जिल्हा निवडणूक अधिकारी अजित साखरे यांनी दिली. नवीन मतदार नोंदणीबाबत माहितीसाठी व आचारसंहितेचा भंग किंवा निवडणूकीच्या खर्चासबंधी तक्रारीबाबत मुंबई उपनगर जिल्हयासाठी तक्रार कक्षाचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १९५० कार्यान्वित करण्यात आला आहे. आचारसंहिता व निवडणूक खर्चाचे पर्यवेक्षण करण्यासाठी १०४ भरारी पथके, ७८ स्थिर सर्व्हेक्षण पथके, ७८ व्हिडिओ सर्व्हेक्षण पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

मुंबई उत्तर मध्ये १६७६ मतदान केंद्रे असून त्यामध्ये स्त्री मतदार ७ लाख ३७ हजार ४०६, पुरुष मतदार ८ लाख ६९ हजार ५३५ व तृतीयपंथी मतदार ३२४ आहेत. मुंबई उत्तर पश्चिम मध्ये १७२८ मतदान केंद्रे असून स्त्री मतदार ७ लाख ६४ हजार ८८४ व तृतीयपंथी मतदार १३ आहेत. मुंबई उत्तर पूर्व मध्ये १६८३ मतदान केंद्रे असून स्त्री मतदार ७ लाख ९ हजार २१७, पुरुष मतदार ८ लाख ४९ हजार ४३४ व तृतीयपंथी मतदार १२३ आहेत. उत्तर मध्य मध्ये १६७५ मतदान केंद्रे असून स्त्री मतदार ७ लाख ४७ हजार ४४२, पुरुष मतदार ९ लाख १८१ व तृतीयपंथी मतदार १६ आहेत.

दक्षिण मध्य मतदारसंघाच्या अणुशक्ती नगर व चेंबूर या दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश मुंबई उपनगर मध्ये येतो़ त्यामध्ये ५३५ मतदान केंद्रे असून स्त्री मतदार २ लाख २७ हजार १९९, पुरुष मतदार २ लाख ६३ हजार ३५० व तृतीयपंथीय मतदार ५ आहेत.

Web Title: There are 70 lakh voters in the 4 Lok Sabha constituencies of Mumbai Suburban District, 481 Third Voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.