...तर विद्यापीठाचा परीक्षांचा भार हलका होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 05:26 AM2018-04-14T05:26:52+5:302018-04-14T05:26:52+5:30

मुंबई विद्यापीठाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा पूर्वीप्रमाणेच महाविद्यालयांकडे सोपवाव्यात, अशी मागणी मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने शिक्षणमंत्र्यांकडे केली होती.

... then the university's tests will be lightweight | ...तर विद्यापीठाचा परीक्षांचा भार हलका होणार

...तर विद्यापीठाचा परीक्षांचा भार हलका होणार

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा पूर्वीप्रमाणेच महाविद्यालयांकडे सोपवाव्यात, अशी मागणी मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने शिक्षणमंत्र्यांकडे केली होती. त्याची दखल घेत शिक्षणमंत्र्यांनी लवकरच बैठक बोलावून निर्णय घेण्याचे शुक्रवारी आश्वासित केले. त्यामुळे विद्यापीठावरील परीक्षांचा भार हलका होणार आहे.
संघटनेचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांनी सांगितले की, प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा महाविद्यालय स्तरावर झाल्या तर त्या वेळेत होऊन निकालही वेळेवर लागतील; तसेच विद्यापीठावरील ताण हलका झाल्याने तृतीय वर्षाच्या परीक्षा व निकाल वेळेत लागतील. परिणामी, पुढील उच्च शिक्षणासाठी परदेशात वा देशातील इतर विद्यापीठात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा होईल.

Web Title: ... then the university's tests will be lightweight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.