चोरीच्या मोटारसायकली जप्त

By admin | Published: November 24, 2014 10:53 PM2014-11-24T22:53:08+5:302014-11-24T22:53:08+5:30

नवी मुंबई परिसरातील पार्किग तसेच मोकळय़ा जागेवर उभ्या केलेल्या मोटारसायकलची चोरी होणो ही बाब नवी मुंबईकरांसाठी आता नित्यनेमाची झाली आहे.

Theft motorcycle seized | चोरीच्या मोटारसायकली जप्त

चोरीच्या मोटारसायकली जप्त

Next
कामोठे : नवी मुंबई परिसरातील पार्किग तसेच मोकळय़ा जागेवर उभ्या केलेल्या मोटारसायकलची चोरी होणो ही बाब नवी मुंबईकरांसाठी आता नित्यनेमाची झाली आहे.  मोटारसायकल चोरीप्रकरणी कामोठे पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका 16 वर्षीय अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. या आरोपींकडून पोलिसांनी जवळपास 7 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. जवळपास 3 लाख रूपये किमतीच्या या गाडय़ा असल्याचे पोलीस सूत्रंकडून समजते. 
एमजीएम रूग्णालय, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, मानसरोवर रेल्वे स्टेशन, कळंबोली पार्किग परिसरात उभ्या केलेल्या गाडय़ा या बनावट चाव्या तसेच हातचलाखीने चालू करून पळविण्याचा झपाटाच सुरू होता. या मोटारसायकलची चोरी केल्यानंतर अवघ्या काही दिवसात या मोटारसायकल संदीप (नाव बदलले आहे) भंगारात विकत असे. या सर्व प्रकाराबाबतची माहिती कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक o्रीराम मुल्यमवार व उपनिरीक्षक सचिन जगताप यांना मिळाली होती. या घटनेची अधिक माहिती घेतल्यानंतर तो मानसरोवर तसेच खांदेश्वर रेल्वे परिसरात मोटारसायकल चोरीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. या मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक सचिन जगताप, उपनिरीक्षक विक्रम साळुंखे, संपत येळकर, जयवंत लोणारे, रवींद्र गीते, सुनील होलार, नितीन सोनावणो आणि रमा पाटील या पोलिसांच्या पथकाने सापळा रचून मानसरोवर रेल्वे स्थानकांच्या परिसरात मोटारसायकलची चोरी करताना रंगेहाथ संदीपला अटक केली. त्याने या परिसरातून दुचाकी गाडय़ा चोरल्याची कबुली पोलिसांना दिली, तर काही गाडय़ा भंगारात विकल्या असल्याचे देखील त्याने सांगितले.
अल्पवयीन असलेला संदीप या मार्गाला कसा लागला याची चौकशी केली असता त्याचे दहावीर्पयतचे शिक्षण झाले असून परिस्थिती बेताचीच असल्याने मौजमजेसाठी तो याकडे वळल्याचे त्याने सांगितले. मित्रंकडे असलेले महागडे फोन, नवनवे कपडे, फिरण्यासाठी गाडय़ा तसेच दररोज हॉटेलमध्ये जेवण या सर्व गोष्टी आपल्यालादेखील करता याव्यात यासाठी हा झटपट मार्ग अवलंबिल्याचे समोर आले आहे. (वार्ताहर)

 

Web Title: Theft motorcycle seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.