नाट्यप्रेमींसाठी मेजवानी : विद्यापीठात रंगणार वसंत नाट्योत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 02:38 AM2018-01-26T02:38:17+5:302018-01-26T02:38:29+5:30

मुंबई विद्यापीठाच्या अ‍ॅकॅडमी आॅफ थिएटर आर्ट्स आणि नवी दिल्लीच्या संगीत नाटक अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने १०वा राष्ट्रीय वसंत नाट्योत्सव मुंबई विद्यापीठाच्या सांताक्रुझ विद्यानगरीत रंगणार आहे. २८ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान रंगणा-या नाट्योत्सवाचे उद्घाटन रविवारी सायंकाळी ६ वाजता सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होईल. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे या नाट्योत्सवाचे प्रमुख अतिथी असतील.

 Theater for theater: The Vasant Natya festival | नाट्यप्रेमींसाठी मेजवानी : विद्यापीठात रंगणार वसंत नाट्योत्सव

नाट्यप्रेमींसाठी मेजवानी : विद्यापीठात रंगणार वसंत नाट्योत्सव

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अ‍ॅकॅडमी आॅफ थिएटर आर्ट्स आणि नवी दिल्लीच्या संगीत नाटक अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने १०वा राष्ट्रीय वसंत नाट्योत्सव मुंबई विद्यापीठाच्या सांताक्रुझ विद्यानगरीत रंगणार आहे. २८ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान रंगणा-या नाट्योत्सवाचे उद्घाटन रविवारी सायंकाळी ६ वाजता सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होईल. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे या नाट्योत्सवाचे प्रमुख अतिथी असतील.
अ‍ॅकॅडमी आॅफ थिएटर आर्ट्सचे संचालक डॉ. मंगेश बनसोड यांनी सांगितले की, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. तर ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकर सोनटक्के आणि ज्येष्ठ पत्रकार राही भिडे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. नाट्योत्सवात सर्व नाटके मोफत दाखविण्यात येणार आहेत. त्यामुळे नाट्यप्रेमींसाठी खºया अर्थाने हा उत्सव म्हणजे मनोरंजनाची पर्वणी असणार आहे.
या नाट्योत्सवाची सुरुवात मंगला बनसोडे आणि नितीन बनसोडे यांच्या लोकनाट्य तमाशा मंडळाच्या ‘तमाशा’ या कार्यक्रमाने होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनासमोरील मैदानात हा तमाशा रंगेल. त्यानंतर दररोज सांताक्रुझ विद्यानगरीतील कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा भवन आणि मुक्ताकाश रंगमंच येथे रोज एक नाटक सादर केले जाईल. नाट्योत्सवात मराठी, बंगाली, भोजपुरी, हिंदी, बघेली, मणिपुरी अशा विविध भाषांमधील नाटकांचा समावेश असेल.
नाट्यप्रेमींना मिळणार या नाटकांची मेजवानी...
नाटकाचे नाव दिनांक व वेळ ठिकाण
रायमा-सायमा २९ जानेवारी, सायं. ७ मराठी भाषा भवन
हे राम ३० जानेवारी, सायं. ७ मुक्ताकाश
ओवी गाऊ विज्ञानाची ३१ जानेवारी, सायं. ४.३० मराठी भाषा भवन
बिदेसिया ३१ जानेवारी, सायं. ७ मुक्ताकाश
कमलादेवी १ फेब्रुवारी, सायं. ७ मराठी भाषा भवन
समाजस्वास्थ्य २ फेब्रुवारी, सायं. ४.३० मराठी भाषा भवन
भगतसिंग... वन्स मोअर २ फेब्रुवारी, सायं. ७ मुक्ताकाश
एकलव्य ३ फेब्रुवारी, सायं. ४.३० मराठी भाषा भवन
केंगडू ३ फेब्रुवारी, सायं. ७ मुक्ताकाश
टूर टूर ४ फेब्रुवारी, सायं. ६.३० मुक्ताकाश

Web Title:  Theater for theater: The Vasant Natya festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.