‘ती’चे व्होट ठरेल सुपरव्होट; राज्यात ४ कोटी ४४ लाख १६ हजार ८१४ महिला मतदार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 12:16 PM2024-04-08T12:16:04+5:302024-04-08T12:16:41+5:30

महिला मतदारसंख्या वाढली

The vote of 'she' will be a super vote, the number of women voters has increased | ‘ती’चे व्होट ठरेल सुपरव्होट; राज्यात ४ कोटी ४४ लाख १६ हजार ८१४ महिला मतदार

‘ती’चे व्होट ठरेल सुपरव्होट; राज्यात ४ कोटी ४४ लाख १६ हजार ८१४ महिला मतदार

मनोज मोघे

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतदानात यंदा महिलाशक्ती निर्णायक ठरणार आहे. मागील वर्षात राज्यात मतदारांची संख्या लक्षणीय वाढली असून आता राज्यात ४ कोटी ४४ लाख १६ हजार ८१४ महिला मतदार आहेत. मागील चार निवडणुकांच्या तुलनेत यावर्षी १ हजार पुरुषांमागे ९२३ महिला अशी लक्षणीय वाढ झाली आहे. 

२००४, २००९, २०१४ आणि २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये महिला मतदारांची संख्या वाढली आहे. राज्यात २००४ मध्ये पुरुष आणि महिला मतदार अशी स्वतंत्र नोंदणी करण्यात आलेली नव्हती. त्यावर्षी एकूण ३ कोटी ४२ लाख ६३ हजार ३१७ मतदारांची नोंदणी झाली. २००९ आणि २०१४ या दोन्ही लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा कमी होती; मात्र २०१९ मध्ये मतदार नोंदणीत महिला मतदारांची संख्या वाढली आहे. 

या तीन मतदारसंघात सर्वाधिक महिला मतदार 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग : 
पुरुषांपेक्षा २१,४७८+ महिला मतदार 
एकूण मतदार - १४ लाख ४० हजार 
महिला मतदार - ७ लाख ३५ हजार ५९७ 
रायगड : 
पुरुषांपेक्षा २७,१६६+ महिला मतदार 
एकूण मतदार - १६ लाख ५३ हजार ९३५ 
महिला मतदार - ८ लाख ४० हजार ४१६ 
भंडारा-गोंदिया : 
पुरुषांपेक्षा ७,९५४+महिला मतदार 
एकूण मतदार - १८ लाख २६ हजार ३०८ 
महिला मतदार - ९ लाख १७ हजार १२४

५ हजार तृतीयपंथी मतदार (* ५ एप्रिल २०२४ पर्यंतची नोंद)
साल    एकूण मतदार    पुरुष    महिला    तृतीयपंथी
२०१९    ८,८६,७६,९४६    ४,६४,२५,३४८    ४,२२,७९,१९२    २,४०६
२०२४*    ९,२६,३७,२३०    ४,८६,०४,७९८    ४,४४,१६,८१४    ५,६१८

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून पुरुष मतदारांची संख्या ५१.४ लाखांनी म्हणजे १२ टक्क्यांनी वाढली, तर महिला मतदारांची संख्या ६२ लाखांनी म्हणजे १६.३ टक्यांनी वाढली आहे.

Web Title: The vote of 'she' will be a super vote, the number of women voters has increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.