काय सांगता! मुंबईतील ७० टक्के आगीच्या घटनांमागे ‘हे’ कॉमन कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 10:02 AM2023-12-13T10:02:46+5:302023-12-13T10:04:07+5:30

फॉल्टी कनेक्शन; आता तरी इलेक्ट्रिकल ऑडिट बंधनकारक करा.

the common reason behind 70% of fire incidents in Mumbai | काय सांगता! मुंबईतील ७० टक्के आगीच्या घटनांमागे ‘हे’ कॉमन कारण

काय सांगता! मुंबईतील ७० टक्के आगीच्या घटनांमागे ‘हे’ कॉमन कारण

सीमा महांगडे,मुंबई :मुंबईतील ७० टक्के आगीच्या घटना इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्याची गंभीर दखल घेत दोन वर्षांनी होणाऱ्या फायर ऑडिटप्रमाणेच इलेक्ट्रिकल ऑडिट बंधनकारक करण्याबाबत आम्ही पीडब्ल्यूडी विभागाच्या मुख्य विद्युत अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत आहोत, अशी माहिती मुंबईचे मुख्य अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर यांनी ‘लोकमत’ला दिली.
सदोष विद्युत जोडणीमुळे आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. २०१५ पासून आतापर्यंत भोगवटा प्रमाणपत्र देण्यापूर्वी मुंबई अग्निशमन दलाकडून एकूण ५,८९० इमारतींची तपासणी करण्यात आली आहे. जानेवारी २०२२ ते सप्टेंबर २०२३ दरम्यान एकूण ८१५ इमारतींची ‘सरप्राइज व्हिजिट’द्वारे तपासणी करण्यात आली आहे.

आतापर्यंत ६,९७५ स्वयंसेवक तसेच १४ एप्रिल २०२१ ते सप्टेंबर २०२३ दरम्यान २,०५० अग्निरक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. मात्र, फायर ऑडिटच नव्हे तर इलेक्ट्रिकल ऑडिटही गरजेचे असून प्रत्येक इमारत आणि आस्थापनांमध्ये ते झाले तर आगीच्या घटना कमी होतील, असा विश्वास अंबुलगेकर यांनी व्यक्त केला. 

आग कशी विझवावी, हेच माहिती नसते :

 केवळ आगविरोधी उपकरणे बसविली जातात. मात्र, त्याकडे नंतर कोणी ढुंकूनही पाहत नाही. एक्सपायरी डेट उलटून जाते.
 आग विझवणारे सिलिंडर कसे वापरावे याची माहिती नसते. घरातील वायरिंगकडे दुर्लक्ष, हे तर सर्रास घडते. 
 कन्सिल वायरिंगची वेळोवेळी तपासणी होत नाही. 
 सोसायटीचे मीटर असणाऱ्या तळमजल्यावर पावसाचे पाणी शिरूनही आगी लागतात. 

आम्ही सज्ज आहोत...

सध्या बचाव कार्यासाठी ३५ अग्निशमन केंद्रे आणि १९ मिनी अग्निशमन केंद्रे आहेत. अलीकडेच प्रभाग स्तरावर २२ क्विक रिस्पॉन्स व्हेइकल्स सुरू केल्यात. नव्या यंत्रणेत हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म, फायर इंजिनच्या आत पाण्याची टाकी, बचाव वाहन असणार आहे. 

 आहार संघटनेसाठी उपहारगृहातील ३८१ कर्मचाऱ्यांना प्राथमिक अग्निसुरक्षा प्रशिक्षण दिले.

 महानगरपालिकेच्या २४ विभाग कार्यालयातील व ५ मुख्य रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांना अग्निसुरक्षेबाबत प्रशिक्षण व प्रात्यक्षिके दाखविली आहेत.  
 ६९ मॉल्सला सरप्राइज व्हिजिट देऊन तपासणी केली आहे.

Web Title: the common reason behind 70% of fire incidents in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.