निवडणुकीत पैसे, साहित्याचेही केले वाटप; अन् बरंच काही...; १४ हजार ३६८ तक्रारींचे निवारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 11:14 AM2024-04-15T11:14:12+5:302024-04-15T11:15:27+5:30

महाराष्ट्रातील मतदारांकडून आतापर्यंत १४ हजार ७५३ इतक्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.

the announcement of lok sabha election complaint received on the website of the election of commission are being addressed promptly | निवडणुकीत पैसे, साहित्याचेही केले वाटप; अन् बरंच काही...; १४ हजार ३६८ तक्रारींचे निवारण

निवडणुकीत पैसे, साहित्याचेही केले वाटप; अन् बरंच काही...; १४ हजार ३६८ तक्रारींचे निवारण

मुंबई : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील मतदारांकडून आतापर्यंत १४ हजार ७५३ इतक्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी १४ हजार ३६८ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. 

पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक म्हणजे दोन हजार ८१८, मुंबई उपनगरातून दोन हजार ३३१ आणि ठाण्यातून दोन हजार १८३ तक्रारी आल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यातून सर्वांत कमी म्हणजे ३४ तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींमध्ये बहुतांश तक्रारी खोट्या असल्याचेही समोर आले. 

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, देशात मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यामध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. नागालँड पहिल्या आणि गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र नागालँडमध्ये आतापर्यंत फक्त १८, तर गुजरातमध्ये सात हजार १२४ तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. महाराष्ट्रातील तक्रारींमध्ये पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक म्हणजे दोन हजार ८१८, मुंबई उपनगरातून दोन हजार ३३१ आणि ठाण्यातून दोन हजार १८३ तक्रारी आलेल्या आहेत. 

मतदार ओळखपत्र न मिळाल्याच्या तक्रारी-

१) सर्वाधिक तक्रारींमध्ये मतदार ओळखपत्र प्राप्त न झालेल्यांमध्ये ४ हजार ५५६ तक्रारींचा समावेश आहे.

२) मतदार ओळखपत्रावरील दुरुस्त्या करण्यास विलंब झाल्याबद्दल एक हजार ८४८ तक्रारी आल्या आहेत. ई-मतदार ओळखपत्राविषयी एक हजार ४७ तक्रारी आहेत, तर नवे ओळखपत्र मिळवण्याचा अर्ज नाकारल्याबद्दल ५२१ तक्रारी दाखल झालेल्या आहेत.

३) मतदार यादीत नाव न सापडल्याबद्दल ५०० तक्रारी आलेल्या आहेत.

अशाप्रकारे मिळते मदत-

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करताना त्यांना समाधानकारक उत्तरे दिली जातात. मतदार ओळखपत्र प्राप्त न झालेल्या मतदारांना मतदार नोंदणीपासून ओळखपत्र मिळेपर्यंतचा कालावधी साधारण ४५ दिवसांचा असतो. मात्र ई-ओळखपत्र दहा-बारा दिवसांत मिळू शकते, त्यासाठी त्यांनी मतदार यादीत मोबाइल क्रमांक नोंदवावा, असे सांगितले जाते. कोणाला मतदार यादीत नाव सापडत नसल्यास त्यांना नाव शोधण्याची प्रक्रिया सांगितली जाते. तसेच कोणाचे नाव वगळले गेले असल्यास त्याचे कारण आणि प्रक्रिया सांगितली जाते.

राजकीय पक्ष, मतदान दिनाबाबतही प्रश्न-

निवडणूक आयोगाकडे आलेल्या तक्रारींमध्ये मतदार ओळखपत्र, मतदार यादी, मतदान चिठ्ठी (स्लीप), निवडणूक आयोगाच्या विविध ॲप्स, राजकीय पक्ष, मतदान दिन आणि इतर या विषयांवरील तक्रारींचा समावेश आहे, अशी माहिती देण्यात आली. 

Web Title: the announcement of lok sabha election complaint received on the website of the election of commission are being addressed promptly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.