सूरज पांचोलीवरील खटल्यास सुरुवात; जिया खान आत्महत्या प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 02:15 AM2018-02-15T02:15:40+5:302018-02-15T02:16:19+5:30

बॉलीवूड अभिनेत्री जिया खान हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप सूरज पांचोलीवर ठेवण्यात आला आहे. बुधवारपासून त्याच्यावरील खटल्यास सुरुवात झाली.

Suraj Pancholi starts shooting; Jiah Khan Suicide Case | सूरज पांचोलीवरील खटल्यास सुरुवात; जिया खान आत्महत्या प्रकरण

सूरज पांचोलीवरील खटल्यास सुरुवात; जिया खान आत्महत्या प्रकरण

googlenewsNext

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री जिया खान हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप सूरज पांचोलीवर ठेवण्यात आला आहे. बुधवारपासून त्याच्यावरील खटल्यास सुरुवात झाली.
जिया खानने ३ जून २०१३ रोजी तिच्या राहत्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. जियाची आई राबिया खान यांच्या म्हणण्यानुसार, जिया आत्महत्या करण्यापूर्वी दोन दिवस सूरजबरोबर राहिली. मात्र, ३ जून रोजी तिने सकाळीच त्याचे घर सोडले. तर सीबीआयनेही सूरजने माहिती लपविल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.
जियाच्या घरातून तीन पानी सही न केलेली एक सुसाईड नोट मुंबई पोलिसांना मिळाल्याचेही सीबीआयने आरोपपत्रात म्हटले आहे. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, या पत्रात जिया आणि सूरजमधील नात्यासंबंधी उल्लेख करण्यात आला आहे. सूरजने तिला मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचेही या पत्रात म्हटले आहे.
बुधवारी न्यायालयाने सरकारी वकिलांना साक्षीदारांची यादी सादर करण्याचे निर्देश दिले. यादी सादर केल्यानंतर न्यायालय संबंधितांना समन्स बजावेल. आता न्यायालयाने खटल्यावरील सुनावणी २१ फेब्रुवारीला ठेवली आहे. सध्या जामिनावर असलेला सूरज बुधवारी खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात उपस्थित होता.
दरम्यान, जियाने आत्महत्या केली नसून तिची हत्या केल्याचा आरोप राबिया खान यांनी केला. स्थानिक पोलीस यादृष्टीने तपास करीत नसल्याचे म्हणत या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात यावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयानेही जुलै २०१४मध्ये हा तपास सीबीआयकडे वर्ग केला. मात्र, सीबीआयनेही स्थानिक पोलिसांच्या दाव्यावर शिक्कामोर्तब केल्याने राबिया यांनी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली.

Web Title: Suraj Pancholi starts shooting; Jiah Khan Suicide Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.