पतीच्या निधनाची बातमी ऐकताच महिलेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 01:39 AM2018-01-19T01:39:26+5:302018-01-19T01:39:26+5:30

पतीच्या निधनाची बातमी ऐकल्यावर पत्नीनेही विहिरीत उडी मारत आयुष्य संपविले. हा धक्कादायक प्रकार गुरुवारी गोरेगावच्या आरे परिसरात घडला.

Suicide of a woman commits suicide after hearing her husband's death | पतीच्या निधनाची बातमी ऐकताच महिलेची आत्महत्या

पतीच्या निधनाची बातमी ऐकताच महिलेची आत्महत्या

googlenewsNext

मुंबई : पतीच्या निधनाची बातमी ऐकल्यावर पत्नीनेही विहिरीत उडी मारत आयुष्य संपविले. हा धक्कादायक प्रकार गुरुवारी गोरेगावच्या आरे परिसरात घडला. याबाबत आरे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक चौकशी सुरू आहे.
शकुंतला रवी हरिजन (४०) असे या मयत महिलेचे नाव आहे. ती आरे कॉलनीच्या सेक्टर १३मधील बालाजीनगरमध्ये राहत होती. त्यांचे पती रवी हे चेन्नईमधील त्यांच्या गावी गेले होते. त्याच ठिकाणी त्यांचे निधन झाले. हे शकुंतला यांना कळताच त्यांना मानसिक धक्का बसला. त्यानंतर गुरुवारी सकाळी ११च्या सुमारास सेक्टर १६मध्ये असलेल्या विहिरीत त्यांचा मृतदेह स्थानिकांना पाण्यावर तरंगताना दिसला.
पतीच्या अंत्यसंस्कारासाठी चेन्नईला येण्याबाबत घरच्यांनी त्यांना विचारले. तेव्हाच त्यांनी ‘माझा शोध घेऊ नका,’ असे उत्तर देत फोन बंद केला होता. त्यानंतर त्यांच्या मृत्यूची बातमी आम्हाला कळाल्याचे नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले. शकुंतला या कर्करोगाने ग्रस्त होत्या. त्यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रियादेखील करण्यात आली होती, असे शेजाºयांनी पोलिसांना सांगितले. २०१२मध्ये त्यांच्या एकुलत्या एका मुलाचाही मृत्यू झाला होता. त्यामुळे हे जोडपे दु:खात होते. त्यातच पतीलादेखील गमावल्याने हा धक्का शकुंतला यांना सहन झाला नसावा. ज्यात त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याच्या अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
शवविच्छेदन अहवाल मिळाला असून नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाला असून यात कोणतीही संशयास्पद बाब आढळलेली नसल्याचे आरे पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील लोखंडे यांनी सांगितले.

Web Title: Suicide of a woman commits suicide after hearing her husband's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.