सुबोध जैस्वाल यांच्या ‘घरवापसी’ने बदलली समीकरणे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 01:07 AM2018-07-02T01:07:53+5:302018-07-02T01:08:00+5:30

केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेल्या आयपीएस अधिकारी सुबोध जैस्वाल यांची अनपेक्षितपणे मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने, आगामी महासंचालक पदाच्या बढत्या व नियुक्तीची समीकरणे बदलली आहेत.

Subodh Jaswal's 'homecoming' changed equations! | सुबोध जैस्वाल यांच्या ‘घरवापसी’ने बदलली समीकरणे!

सुबोध जैस्वाल यांच्या ‘घरवापसी’ने बदलली समीकरणे!

Next

- जमीर काझी

मुंबई : केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेल्या आयपीएस अधिकारी सुबोध जैस्वाल यांची अनपेक्षितपणे मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने, आगामी महासंचालक पदाच्या बढत्या व नियुक्तीची समीकरणे बदलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या नियुक्तीच्या ‘मास्टर स्ट्रोक’ने अतिवरिष्ठ पदावरील नेमणुकांवर परिणाम होणार आहे.
जैस्वाल यांच्या ‘घरवापसी’चा पहिला फटका अप्रत्यक्षपणे नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख अप्पर महासंचालक डी. कनकरत्नम यांना बसला आहे. सतीश माथूर यांच्या निवृत्तीनंतर ३० जूनला होणारे त्यांचे प्रमोशन किमान आणखी दोन महिने लांबणीवर पडले आहे. पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना मुदतवाढ मिळाल्यास, त्यात आणखी महिन्याभराची वाढ होईल. त्याचप्रमाणे, मुंबईच्या आयुक्तपदाच्या शर्यतीत असलेल्या परमबीर सिंग यांचे सप्टेंबरमध्ये होणारे प्रमोशन सव्वा वर्षासाठी लांबणीवर पडणार आहे. अर्थात, राज्य सरकारने ‘एसीबी’च्या रिक्त महासंचालकपदाबाबत निर्णय घेतल्यास, या दोन अधिकाऱ्यांची बढतीची प्रतीक्षा कमी होऊ शकते. तूर्तास गृहविभाग त्याबाबत फारसे उत्सुक नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
महाराष्टÑ पोलीस दलात महासंचालकांची सध्या आठ पदे मंजूर आहेत. यापैकी एसीबी वगळता अन्य सर्व पदावर अधिकारी कार्यरत आहेत. त्यामध्ये डीजीपी दत्ता पडसलगीकर सर्वांत ज्येष्ठ अधिकारी, तर १९८५च्या बॅचचे आयपीएस व मुंबईचे नूतन आयुक्त सुबोध जैस्वाल दुसºया क्रमांकावर आहेत. गेली १० वर्षे केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेली जैस्वाल यांच्या सेवानिवृत्तीस सप्टेंबर २०२२ पर्यंत म्हणजे आणखी किमान सव्वा चार वर्षे आहेत. शुक्रवारी दुपारपर्यंत त्यांचे महाराष्टÑात परतण्याचे निश्चित झालेले नव्हते. त्यामुळे माथूर निवृत्त झाल्यानंतर महासंचालकपदासाठी १९८७च्या आयपीएस बॅचचे कनकरत्नम पात्र ठरणार होते, तर त्यानंतर पुढील तीन महिन्यांत पडसलगीकर व एस. पी. यादव अनुक्रमे आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये निवृत्त होणार असल्याने, त्यांच्या जागी नवी मुंबईचे आयुक्त हेमंत नागराळे व ठाण्याचे आयुक्त परमबीर सिंग यांचा बढतीसाठी क्रम लागणार होता. आता पडसलगीकर यांना तीन महिने मुदतवाढ मिळाल्यास, सप्टेंबरमध्ये यादव निवृत्त झाल्यानंतर कनकरत्नम यांना डीजी पदी बढती मिळेल. पडसलगीकर यांच्या निवृत्तीनंतर नागराळे यांचा नंबर लागू शकेल. संजय बर्वे हे पुढील वर्षी ३० सप्टेंबरमध्ये निवृत्त होणार असल्याने, परमबीर सिंग यांना त्यांच्यानंतर प्रमोशन मिळू शकणार आहे.
जैस्वाल यांच्या आगमनाचा अप्रत्यक्ष फटका या अधिकाºयांच्या बढतीला बसला आहे. शिवाय जैस्वाल
यांच्या निवृत्तीपूर्वी हे तीन अधिकारी
व सध्याचे सर्व ‘डीजी’ रिटायर
होत असल्याने, त्यांची पोलीस महासंचालकपदाची नियुक्ती
हुकली आहे. त्यात पडसलगीकर
व बर्वे यांच्याशिवाय होमगार्डचे
संजय पांड्ये, पोलीस गृहनिर्माणचे बिपीन बिहारी, सुधार सेवा (कारागृह)चे सुरेंद्र एन पांड्ये यांचा समावेश आहे.

उच्च न्यायालयात आव्हान देऊ
सेवाज्येष्ठतेमध्ये डावलण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देऊन बढती मिळविलेले संजय पांड्ये १९८६च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. ते ३० जून २०२२ ला रिटायर होणार असून, जर जैस्वाल महाराष्टÑात परतले नसते, तर सप्टेंबरमध्ये एस. पी. यादव यांच्या निवृत्तीनंतर तेच सर्वांत ज्येष्ठ अधिकारी बनले असते. राज्य सरकारला त्यांना होमगार्डशिवाय पोलीस महासंचालक किंवा एसीबीच्या ठिकाणी नियुक्ती करावी लागली असती. मात्र, जैस्वाल यांच्या वापसीमुळे सरकारपुढील हा प्रश्न आपसूकपणे मिटला आहे. पांड्ये हे त्यांच्यानंतर असल्याने, त्यांची मुख्य पदाव्यतिरिक्त अन्यत्र नेमणूक केल्यास त्यात काहीही आक्षेपार्ह नसेल, असे जाणकारांकडून सांगण्यात येते.

जैस्वाल यांना पाच किंवा आठ महिने
पोलीस महासंचालक पडसलगीकर ३० आॅगस्टला निवृत्त झाल्यास, मुंबईचे आयुक्त जैस्वाल हे त्या पदी नियुक्ती होणे अपेक्षित आहे. जर पडसलगीकर यांना ३ महिने मुदतवाढ दिल्यास, जैस्वाल यांना मुंबईत पाच महिने मिळतील आणि पडसलगीकर यांना सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाल्यास. जैस्वाल यांना आठ महिन्यांचा कालावधी मिळेल. मात्र, मुदतवाढ देण्याच्या भूमिकेला अनेक आयपीएस अधिकाºयांचा विरोध आहे. त्यामुळे पडसलगीकर हे ६ महिने मुदतवाढ घेण्यास राजी होण्याची शक्यता दुर्मीळ असल्याचे सांगितले जाते.

Web Title: Subodh Jaswal's 'homecoming' changed equations!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस