विदर्भातील बंद सूतगिरण्या सुरू करण्यासाठी धोरण आखा - मुख्यमंत्र्यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 12:51 AM2018-01-09T00:51:26+5:302018-01-09T00:51:49+5:30

विदर्भातील बंद पडलेल्या सहकारी सूतगिरण्या पुन्हा सुरू व्हाव्यात आणि त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम बनून कायमस्वरूपी सुरू राहाव्यात यासाठी धोरण आखण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एका बैठकीत दिले.

Strategies to start Vidarbha closed yarns - Chief Minister's instructions | विदर्भातील बंद सूतगिरण्या सुरू करण्यासाठी धोरण आखा - मुख्यमंत्र्यांचे निर्देश

विदर्भातील बंद सूतगिरण्या सुरू करण्यासाठी धोरण आखा - मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Next

मुंबई : विदर्भातील बंद पडलेल्या सहकारी सूतगिरण्या पुन्हा सुरू व्हाव्यात आणि त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम बनून कायमस्वरूपी सुरू राहाव्यात यासाठी धोरण आखण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एका बैठकीत दिले.
मुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयातील दालनात मुख्यमंत्र्यांनी आज या सूतगिरण्यांच्या समस्यांबाबत ‘लोकमत’चे मीडियाचे चेअरमन
आणि यवतमाळ येथील प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा आणि वरिष्ठ अधिका-यांसमवेत बैठक घेतली. या वेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, वित्त विभागाचे प्रधान सचिव आर.ए. राजीव (व्यय) आणि वस्रोद्योग विभागाचे सचिव अतुल पाटणे तसेच प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे उपाध्यक्ष कीर्ती गांधी या वेळी उपस्थित होते.
सहकारी सूतगिरण्यांना वीजदरात सवलत देणार नाही तोवर त्या आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरणार नाहीत, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी
याबाबत अन्य राज्यांचा अभ्यास करून प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश अधिकाºयांना दिले. यवतमाळची प्रियदर्शिनी सूतगिरणी लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी अधिका-यांना दिल्या.

ठोस पावले उचला
विजय दर्डा यांनी यावेळी विदर्भातील सुतगिरण्यांच्या विविध समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि या सुतगिरण्यांना नवसंजीवनी देण्यासाठी सरकारने ठोस पाऊले उचलावीत, अशी आग्रही मागणी केली.

Web Title: Strategies to start Vidarbha closed yarns - Chief Minister's instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.