सायन-पनवेल महामार्गावर विचित्र अपघात, 10 गाड्या आदळल्या एकमेकांवर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 11:21 AM2017-10-03T11:21:08+5:302017-10-03T11:29:01+5:30

सायन पनवेल महामार्गावर मंगळवारी ( 3 ऑक्टोबर ) सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास पनवेलहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर विचित्र अपघात घडला.

Strange accidents on Sion-Panvel highway, 10 trains collided with each other | सायन-पनवेल महामार्गावर विचित्र अपघात, 10 गाड्या आदळल्या एकमेकांवर 

सायन-पनवेल महामार्गावर विचित्र अपघात, 10 गाड्या आदळल्या एकमेकांवर 

Next

भालचंद्र जुमलेदार/पनवेल - सायन पनवेल महामार्गावर मंगळवारी ( 3 ऑक्टोबर ) सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास पनवेलहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर विचित्र अपघात घडला. कलंबोळीतील मॅकडोनाल्ड परिसरात जवळपास 10 गाड्या एकमेकांवर आदळून हा विचित्र अपघात घडला. या अपघातामुळे जवळपास 2 तास वाहतूक कोंडी झाली असून सायन पनवेल महामार्गावर 3 ते 5 किलोमीटर अंतरावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

त्यातच, नवी मुंबई शहरात फिफा फुटबॉल वर्ल्डकप असल्यामुळे येथील शेकडो पोलीस कर्मचारी बंदोबस्तामध्ये व्यस्त असल्यामुळे या अपघाताकडे लक्ष देण्यासाठी पोलीस कर्मचा-यांची संख्या कमी प्रमाणात उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे.


 

Web Title: Strange accidents on Sion-Panvel highway, 10 trains collided with each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात