पाऊस थांबता थांबेना! पालघरमध्ये पूरस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 06:37 AM2018-07-11T06:37:28+5:302018-07-11T06:37:58+5:30

मुसळधार पावसामुळे सलग चौथ्या दिवशी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. सलग तीन दिवस मुंबई शहर आणि उपनगरात कोसळलेल्या मुसळधार पावसाने मंगळवारीही आपला जोर कायम ठेवला.

Stopping the rain stops! Flooding in Palghar | पाऊस थांबता थांबेना! पालघरमध्ये पूरस्थिती

पाऊस थांबता थांबेना! पालघरमध्ये पूरस्थिती

Next

मुंबई : मुसळधार पावसामुळे सलग चौथ्या दिवशी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. सलग तीन दिवस मुंबई शहर आणि उपनगरात कोसळलेल्या मुसळधार पावसाने मंगळवारीही आपला जोर कायम ठेवला.
पाऊस काही थांबता थांबण्याची चिन्हे दिसत नव्हती.
पुरामुळे वसई रोड व नालासोपारा स्टेशनदरम्यान शताब्दी, राजधानी एक्स्प्रेससह अनेक गाड्या सकाळपासून
अडकल्या. त्यातील प्रवाशांना खाद्य पदार्थ देण्यासाठी लष्कराला पाचारण केल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी सांगितले. नालासोपारा ते वसई दरम्यान पुराच्या पाण्यात अडकलेल्या बडोदा एक्स्प्रेसमधील सुमारे दोन हजार प्रवाशांची पालघर जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीने
सुटका केली. त्यांना नायगाव स्टेशनपर्यंत खासगी बसने सोडण्यात आले. त्यांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर पाणी आल्याने एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान घसरले.
त्यामुळे विमान वाहतुकीवरही परिणाम झाला. १४० विमाने सरासरी २२ मिनिटे उशीराने उतरली तर २७१ विमानांच्या
उड्डाणालाही विलंब झाला. २४ तासांत मुंबईत तब्बल १८४.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दादर, भायखळा, लालबाग, माटुंगा व सायन परिसर जलमय झाल्याने या भागातील रस्ते वाहतूक बंद करण्यात आली होती. तर सायन, कुर्ला रेल्वे मार्गावर पाणी आल्याने सकाळी लोकल खोळंबल्या. ठाणे जिल्ह्याला पावसाने मोठा तडाखा दिला.

...तर रेल्वेचे खासगीकरण करा
रेल्वे रूळ पाण्याखाली जाऊन दरवर्षी सेवा ठप्प होते. लोकांचे
हाल होतात. रेल्वेला हा व्याप झेपत नसेल तर त्यांनी विमान
सेवेप्रमाणे रेल्वेचे खासगीकरण करावे, अशी उच्च न्यायालयाने
मंगळवारी रेल्वे प्रशासनाला चपराक लगावली.

कर्जतमध्ये शेतकरी बुडाला
कर्जतमध्ये शेतकरी राघो आंबो दरवडा (५२) यांचा पाण्यात
वाहून गेल्याने मृत्यू झाला तर मालाड पश्चिमेकडील व्हॅनिला
तलावात संतोष तुकाराम कांबळे हे बुडाले.

खबरदारी म्हणून वीजपुरवठा खंडित
संततधार पावसामुळे, वसईविरार भागाला वीजपुरवठा करणाऱ्या महापारेषण वसई, अति उच्च दाब केंद्राच्या नियंत्रण कक्षामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने खबरदारी म्हणून महावितरणने मंगळवारी सकाळी परिसरातील वीजपुरवठा खंडित केला होता.

बुडून मृत्यू
मालाड पश्चिमेकडील
व्हॅनिला तलावात सोमवारी
रात्री साडेअकराच्या सुमारास
संतोष तुकाराम कांबळे नावाची
व्यक्ती बुडाली. अग्निशमन
दलाने त्यांस बाहेर काढून
मालाड येथील जनरल
रुग्णालयात दाखल केले.
मात्र उपचारादरम्यान त्यांचा
मृत्यू झाला.

वसई-विरार रेल्वेमार्ग
पाण्याखाली गेल्यामुळे
शताब्दी, राजधानी आणि
दुरांतो एक्स्प्रेससह एकूण
५० मेलना फटका बसला.
त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या
प्रमाणात हाल झाले.

इशारा
११ जुलै रोजी पालघर
जिल्ह्यात तुरळक ठिकाणी
अतिवृष्टी होईल. १२ ते १४
जुलैदरम्यान पालघर जिल्ह्यात
तुरळक ठिकाणी मुसळधार
पाऊस पडेल.
११ जुलैला तुरळक
ठिकाणी मुंबईत अति
मुसळधार पाऊस पडेल, तर
ठाणे जिल्ह्यात तुरळक
ठिकाणी अतिवृष्टी होईल.
१२ ते १४ जुलैदरम्यान
मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात
तुरळक ठिकाणी मुसळधार
पाऊस पडेल, रायगड
नालासाप्े ाारा जिल्ह्यात अतिवष्टृ ी होइलर्् ा.

Web Title: Stopping the rain stops! Flooding in Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.