मूळ विषयांना बगल देण्यासाठी नोटिसीचे राजकारण - चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 05:06 AM2018-06-21T05:06:36+5:302018-06-21T05:06:36+5:30

जामनेर तालुक्यातील वाकडी येथे विहिरीत पोहायला गेलेल्या मुलांना झालेल्या मारहाणीचा मुद्दा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून उचलून धरला.

Statement of the policy to raise original issues - Chavan | मूळ विषयांना बगल देण्यासाठी नोटिसीचे राजकारण - चव्हाण

मूळ विषयांना बगल देण्यासाठी नोटिसीचे राजकारण - चव्हाण

Next

मुंबई : जामनेर तालुक्यातील वाकडी येथे विहिरीत पोहायला गेलेल्या मुलांना झालेल्या मारहाणीचा मुद्दा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून उचलून धरला. या घटनेचे व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाले होते, माध्यमांनीही त्या दाखविल्या. मात्र, मुळ मुद्दयाला बगल देण्यासाठी राज्य बालहक्क आयोगाकडून राहुल गांधी यांना नोटीस पाठविण्यात आल्याचा आरोप प्रदेश काँग्रेस अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी बुधवारी केला.
भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून दलित, मागासवर्गीय, गरीबांवर अन्याय वाढले आहेत. त्याचे ताजे उदाहरण जळगावमधील मुलांवरील अत्याचाराचे आहे. हा प्रकार समोर आल्यावर त्याबाबत कोणतीही कारवाई केली जात नाही. अशा प्रसंगी विरोधकांनी आवाज उठवायचा नाही का, अशा गोष्टींविरोधात आवाज उठवत कारवाईची मागणी केल्यास त्यात गैर काय असा सवाल करतानाच मुळ विषयापासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी राहुल गांधींना अशी नोटीस बजावण्यात आल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. नोटीसीबाबत कायदेशीर बाबी तपासून आम्ही आमची पुढील भूमिका स्पष्ट करू, असेही चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: Statement of the policy to raise original issues - Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.