विशेष सरकारी वकिलांची प्रतिदिन फी ३५ हजार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 04:21 AM2017-12-04T04:21:39+5:302017-12-04T04:21:55+5:30

बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणात, विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहणारे ज्येष्ठ विधिज्ञ राजा ठाकरे यांना प्रतिदिन ३५ हजार, तर

Special government advocates fee daily 35 thousand! | विशेष सरकारी वकिलांची प्रतिदिन फी ३५ हजार!

विशेष सरकारी वकिलांची प्रतिदिन फी ३५ हजार!

Next

मुंबई : बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणात, विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहणारे ज्येष्ठ विधिज्ञ राजा ठाकरे यांना प्रतिदिन ३५ हजार, तर अ‍ॅड. ए. एम. चिमलकर यांना २० हजार रुपये फी दिली जाणार आहे. सव्वादोन वर्षांपूर्वी परमार यांनी ठाण्यातील काही नगरसेवकांकडून दिल्या जाणाºया त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. या प्रकरणी विविध पक्षांच्या ५ नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
परमार यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या विविध प्रोजेक्टसाठी ठाण्यातील नगरसेवकांनी घेतलेले पैसे व वारंवार केल्या जाणाºया मागण्यांबाबत लिहून ठेवले होते. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक बनवले होते. त्याचप्रमाणे या प्रकरणातील दोषींना कडक शासन व्हावे, यासाठी सत्र व उच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील राजा ठाकरे व अवधूत चिमलकर यांची नियुक्ती केली आहे. त्या बदल्यात प्रत्येक परिणामकारक सुनावणीच्या दिवसासाठी दोघांना अनुक्रमे ३५ व २० हजार रुपये देण्याचा निर्णय विधि व न्याय विभागाने घेतला आहे. तसेच विचारविनिमय करण्यासाठी प्रत्येक तासाला १० हजार रुपये दिले जाणार आहेत.

Web Title: Special government advocates fee daily 35 thousand!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.